|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शब्द,आचार,विचारातून मानवी स्वभाव घडतो : राजेंद्र भिडे

शब्द,आचार,विचारातून मानवी स्वभाव घडतो : राजेंद्र भिडे 

प्रतिनिधी / कोल्हापूर

माणसाच्या स्वभावात चांगले अथवा वाईट असे काहीही नसते. माणसाने देहबोलीतून वापरलेले शब्द, त्याच्या वागण्यातील आचार विचार यातून त्याचा स्वभाव घडतो. असे प्रतिपादन राजेंद्र भिडे यांनी केले.  हस्ताक्षर आणि मानवी स्वभावाचे विश्लेषण या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी बॅँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत पाचवे पुष्प त्यांनी गुंफले.

  मानवी स्वभावामध्ये चांगले किंवा वाईटाचा अतिरेक हा घातकी असतो. मानवी शब्दाची टक्केवारी काढल्यास 7 टक्के शब्द संवाद साधतात. 38 टक्के शब्द उच्चार करतात तर 55 टक्के ही देहाबोली असते. दुसऱयाचे मानसशास्त्र समजुन घेताना स्वताच्या भावना त्यामध्ये आड येता कामा नये. हस्ताक्षर लेखनासारखे दुसरे कोणतेही क्षेत्र उत्तम नाही. मर्यादा माहित असतील तर या क्षेत्रात आपण सर्वात जास्त प्रगती करु शकतो.हस्ताक्षराच्या माध्यमातून मानवी स्वभाव कळण्यास मदत होते.

स्वागत श्रीराम धर्माधिकारी यांनी केले. परिचय राजेंद्र कींकर यांनी करून दिला. सुत्रसंचालन दीपक भागवत यांनी केले. यावेळी रामचंद्र टोपकर, ऍड.विवेक शुक्ल, दिपा तेंडुलकर, सतिष कुलकर्णी, संतोष कोडोलीकर, श्रीकांत लिमये उपस्थित होते.

 

 आजचे व्याख्यान

विषय – तंत्रज्ञान उद्याचे व्याख्याते -जयराज साळगावकर

Related posts: