|Friday, December 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » अरुण शौरी रुग्णालयात दाखल

अरुण शौरी रुग्णालयात दाखल 

पुणे / प्रतिनिधी

अंगणात फेरफटका मारताना भोवळ येऊन पडल्याने जखमी झालेले माजी केंद्रीय मंत्री व जे÷ पत्रकार अरुण शौरी यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले.

लवासा सिटीमधील घराच्या अंगणात फिरताना रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास शौरी यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यामुळे त्यांच्या मेंदूला आणि डोक्मयाला इजा झाली आहे. रविवारी रात्री दहा वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्राथमिक चाचण्याही करण्यात आल्या. सुरुवातीला त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

Related posts: