|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पोलीस दाम्पत्याचे निलंबन, अटक

पोलीस दाम्पत्याचे निलंबन, अटक 

पोलीस अधीक्षकांकडून कारवाई

रत्नागिरी/ प्रतिनिधी

राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सागर जाधव याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या पोलीस दाम्पत्याला सोमवारी रत्नागिरी शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी  पौर्णिमा मानसिंग भोसले व मानसिंग भोसले (ऱा पोलीस वसाहत रत्नागिरी) असे या पोलीस दाम्पत्याचे नाव आह़े  त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आह़े  नुकताच उच्च न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होत़ा

  आरोप असलेले दोघेही संशयित रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पौर्णिमा व मानसिंग भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आह़े  राजापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सागर दिलीप जाधव (33, ऱा कारवांचीवाडी, रत्नागिरी) याने 15 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होत़ी सागर याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्या आत्महत्येस पौर्णिमा व मानसिंग भोसले हे कारणीभूत असल्याचे म्हटले होत़े  त्यानुसार सागर याचा भाऊ विनायक दिलीप जाधव याने शहर पोलीस ठाण्यात या दाम्पत्याविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी 

  सागर याची नुकतीच राजापूर पोलीस ठाण्यात चालक म्हणून बदली झाली होत़ी यापर्वी तो रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होत़ा या दरम्यान त्याचे शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पौर्णिमा भोसले हिच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होत़े  ही बाब पौर्णिमा हिच्या पतीला समजल्यानंतर सागर याच्याबरोबर त्याचे वाद निर्माण झाले होत़े  मात्र तरीदेखील त्याचे प्रेमसंबंध चालू राहिले होत़े दरम्यान सागर याचे लग्न झाल्यानंतर पौर्णिमा हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधात मिठाचा खडा पडला होत़ा  सागर आपल्याला टाळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने सागर याच्या घरी जावून पत्नीसमोर चांगलाच हंगामा केला होत़ा  सागर याचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होत़ी तसेच पौर्णिमा हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून दोघेही ब्लॅकमेल करत असल्याचे समोर आले होत़े सागर याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये पौर्णिमा भोसले व तिचा पती मानसिंग हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले होत़े  त्यानुसार सागर याचा भाऊ विनायक दिलीप जाधव याने पौर्णिमा व तिच्या पतीविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी  या प्रकरणी पोलिसांनी पौर्णिमा व तिचा पती मानसिंग याच्याविरूद्ध भादंवि कलम 306, 384, सह 34 नुसार गुन्हा दाखल केला होत़ा

Related posts: