|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ 1 जानेवारीपासून लागू

‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ 1 जानेवारीपासून लागू 

कर्नाटक – महाराष्ट्रासह आठ राज्यात योजना

बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असणारी ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना  येत्या 1 जानेवारी पासुन कर्नाटकासह  8 राज्यांमध्येही लागू होणार आहे. यामुळे या आठ राज्यातील बीपीएल रेशनकार्ड धारकांना ‘आंतरराज्य पोर्टेबिलीटी’ द्वारे या राज्यात असणाऱया कोणत्याही रेशन दुकानातून आपले कार्ड दाखवून आहारधान्य सबसीडी दरात मिळविता येणार आहे.

कर्नाटक वगळता अन्य राज्यात केंद सरकारने निर्धारीत केलेल्या 5 रूपये किलो दराचा तांदूळ 3 रूपये (सबसीडी दर) देऊन खरेदी करावा लागणार आहे. कर्नाटकात बीपीएल कार्डधारकांच्या प्रत्येक सदस्यांमागे 7 किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. मात्र अन्य राज्यात सबसीडीच्या दरात म्हणजेच 3 रूपये किलो दराने मिळणार आहे. या आठ राज्यामधील बीपेएल कार्ड धारकांची ई-केवायसी (आधार आधारित बायोमेट्रिक) संग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयएमपीडीएस (इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस) या ऑनलाईन डाटाबेस व्यवस्थेद्वारे ही योजना कार्यान्वित होणार आहे.

या योजनेचा भाग म्हणुन कर्नाटक – केरळ सीमेवरील भागात आंतरराज्य पोर्टेबिलीटी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली, ती यशस्वी झाली. या अंतर्गत या दोन्ही राज्यातील 3 ते 4 बीपीएल कार्ड धारकांनी रेशान दुकानातून आहार धान्य मिळविले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

चौकट करणे

कर्नाटकासह महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पंजाब व हरियाणा या आठ राज्यात ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत बीपीएल रेशनकार्ड धारकांना या संबंधीत राज्यातील रेशन दुकानातून आहारधान्य घेता येणार आहे.

Related posts: