|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » ‘चांद्रयान-2’ : विक्रम लँडरचे अवशेष सापडले

‘चांद्रयान-2’ : विक्रम लँडरचे अवशेष सापडले 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-2’ मोहिमेतील विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा केला आहे. ‘नासा’ने आज ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

या पूर्वीही विक्रम लँडरबाबत नासाने मोठा खुलासा केला होता. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान 7 सप्टेंबरला ‘चांद्रयान-2’ चा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर इस्रोकडून अनेकदा विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र, इस्रोला त्यामध्ये अपयश आले होते.

नासाच्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधून काढल्या आहेत. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरणार होते, त्यापासून 750 मीटर अंतरावर नासाला त्याचे तीन अवशेष आढळले. विक्रमचे तीन मोठे तुकडे 2*2 पिक्सलचे आहेत. नासाने एक किलोमीटर अंतरावरून विक्रमची छायाचित्र टिपली आहेत.

 

Related posts: