|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » अंबरनाथ येथील सरकारी रुग्णालयात 12 रुग्णांना इंजेक्शनची बाधा

अंबरनाथ येथील सरकारी रुग्णालयात 12 रुग्णांना इंजेक्शनची बाधा 

ऑनलाईन टीम / अंबरनाथ :

अंबरनाथ येथील डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णांना इंजेक्शनने बाधा झाली आहे. काही जणांनी रक्ताच्या उलटय़ा केल्या तर काहींची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

बाधा झालेल्या 12 रुग्णांनी डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात थंडी आणि ताप या आजारांवर उपचार घेतले. त्यावेळी त्यांना इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही जणांनी रक्ताच्या उलटय़ा केल्या. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोघांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे.

रुग्णांना मुदतबाह्य औषधे आणि इंजेक्शन दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी रुग्णालयातून इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.

Related posts: