|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » भारत सरकारनेच थकविले एअर इंडियाचे 798 कोटी

भारत सरकारनेच थकविले एअर इंडियाचे 798 कोटी 

मोदींच्या दौऱयांचेच 459 कोटी थकीत

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडिया कंपनीचे भारत सरकारनेच 797 कोटी 95 लाख रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकाराखाली एअर इंडियाने दिलेल्या उत्तरामधून ही आकडेवारी मिळाली आहे.

भारत सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नाही. या प्रवासखर्चाचे भारत सरकारने 797 कोटी 95 लाख रुपये थकवले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 458 कोटी 95 लाख 90 हजार रुपये केवळ मोदींच्या दौऱयांची रक्कम आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते कमांडो लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी दाखल केलेल्या अर्जाला एअर इंडियाने उत्तर दिले आहे. यामध्ये मोदींच्या एकूण प्रवासाचा खर्च 1 हजार 321 कोटी 41 लाख रुपये झाला असून त्यापैकी 862 कोटी 45 लाख रुपये कंपनीला सरकारने दिले आहेत. तर अद्याप 458 कोटी 95 लाख 90 हजार रुपये सरकारने अद्याप कंपनीला दिलेले नाहीत.

डबघाईला आल्यामुळे भारत सरकार एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या येत्या मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत काही दिवसांप्वी माहिती दिली आहे. असे असतानाही सरकारकडूनच एअर इंडियाचे पैसे थकविल्याचे समोर आले आहे.

 

Related posts: