|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘पानिपत’ येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

‘पानिपत’ येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला 

 ऑनलाईन टीम / पुणे :

पानिपतच्या तिसऱया युध्दाचा थरार आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. पानिपतच्या तिसऱया युद्धावर आधारित या सिनेमाची कथा आहे. इ.स. 1761 मध्ये झालेले हे युद्ध भारताच्या इतिहासातले सर्वांत महत्त्वाचे युद्ध मानले जाते. येत्या 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘हर हर महादेव’चा जयघोष करीत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज…. मराठय़ांचा इतिहास भव्य-दिव्य रूपात पडद्यावर मांडणाऱया ‘पानिपत’ सिनेमाचा टेलर प्रदर्शित झाला अन् सर्वत्र या सिनेमाविषयी चर्चा, त्याचे कौतुक झाले आणि सिनेमाविषयी असलेली उत्सुकता अनेकांनी दर्शवली.

‘मराठा… भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.’ असे म्हणत सिनेमाच्या टेलरची सुरुवात होते आणि आपण प्रत्येक दृश्यागणिक जणू पानिपतच्या रणभूमीत हजर झालो आहोत असा आभास निर्माण केला जातो. टेलरनंतर या सिनेमातील कलाकार, गाणी एक-एक करुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली.

ज्या युध्दाची गोष्ट वाचनाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचली ते युध्द आता मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहेत. मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसणार आहे तर अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका संजय दत्त यांनी साकारली आहे. तसेच, सौंदर्य आणि शौर्य यांचा मिलाफ असलेल्या पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे.

‘मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम’, असं ज्या युद्धाचं वर्णन केलं जातं त्या ‘पानिपत’च्या तिसऱया युद्धाचा थरार 6 डिसेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.

Related posts: