|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » बॉस हा नेहमीच बरोबर असतो : सुप्रिया सुळे

बॉस हा नेहमीच बरोबर असतो : सुप्रिया सुळे 

 

ऑनलाईन टीम  / मुंबई : 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यासोबत काम करण्याची ऑफर दिल्याचा खुलासा केला आहे. यावर शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवार फक्त माझे वडील नाहीत तर बॉसही आहेत, आणि बॉस हा नेहमी बरोबर असतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी भाजपाला समर्थन देत पुन्हा स्वगृही परतले त्याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांसंबंधी पक्ष निर्णय घेईल. ते आधी माझे मोठे बंधू आहेत. मला पाच मोठे भाऊ आहेत. आम्ही एकत्र कुटुंब आहोत. जर माझा मुलगा चुकत असेल तर त्याचा कान ओढण्याचा, ओरडण्याचा मला हक्क आहे. पण अजितदादा मोठे आहेत, त्यांना माझा कान ओढण्याचा हक्क आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

 

Related posts: