|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » डोंबिवली लोकलमधील गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत

डोंबिवली लोकलमधील गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत 

लोकलची संख्या वाढवण्यात यावी  : खासदार सुप्रिया सुळे

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱया गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे डोंबिवलीकडे जाणाऱया आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱया लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, डोंबिवली लोकल टेनमध्ये होणाऱया प्रमाणापेक्षा जास्त गर्दीचा तसंच लोकल उशिराने धावण्याचा मुद्दा नियम 377 अंतर्गत उपस्थित केला आहे. कल्याण स्थानकावरुन येणारी टेन जेव्हा डोंबिवलीला येते तेव्हा गर्दीने पूर्ण भरलेली असते. त्यामुळे डोंबिवलीकरांना टेनमध्ये चढणं अशक्मय होतं. याबाबत रेल्वे अधिकाऱयांकडे मी वारंवार तक्रार केली. मात्र यावर अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

Related posts: