|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » महापोर्टल परीक्षा म्हणजे व्यापमपेक्षा व्यापक घोटाळा : राजू शेट्टी

महापोर्टल परीक्षा म्हणजे व्यापमपेक्षा व्यापक घोटाळा : राजू शेट्टी 

पुणे  / प्रतिनिधी  : 

फडणवीस सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले महापोर्टल म्हणजे मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळय़ापेक्षाही व्यापक घोटाळा असून, पारदर्शकतेच्या नावाखालील खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे. त्यामुळे राज्यसरकारने हे महापोर्टल तातडीने बंद करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केली.

पुण्यातील महापोर्टल केंद्रावर मोठा सावळा गोंधळ झाला असून, सर्व्हर बंद व इतर तांत्रिक अडचणीने परीक्षा बंद पाडली गेली आहे. या वेळी ही परीक्षा सुरू असताना अनेक विद्यार्थी गुगलवरती ऑनलाईन पाहून पेपर सोडवत असल्याचे निदर्शनास आले. राज्याच्या कानाकोपऱयातून हजारो विद्यार्थी या परीक्षांसाठी आले होते. वास्तविक, शासन त्याच जिह्यांच्या ठिकाणी सेंटर देऊन परीक्षा घेणार होते. मात्र, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरत असताना स्वतःच्या जिह्यातील पर्यायी केंद्र दिले असतानादेखील त्यांना इतर सेंटर देऊन परीक्षा घेतली जात आहे.

हे पोर्टल भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकले असून ते बंद करण्यासाठी राज्यभरातील तरूणाई रस्त्यावर उतरत आहे. एकच विद्यार्थी वेगवेगळय़ा ठिकाणी परीक्षेस बसताना दिसत असून, काही विशिष्ट परीक्षा केंदे असेही प्रकार होत आहेत. ती पूर्णतः मॅनेज झाल्याचेही पुराव्यासहित दिसून आले आहे. काही उमेदवार चुकीच्या पद्धतीने पैसे भरून सेवेमध्ये रूजू झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

 

Related posts: