|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महापोर्टल व्यापम पेक्षाही मोठा घोटाळा : राजू शेट्टी

महापोर्टल व्यापम पेक्षाही मोठा घोटाळा : राजू शेट्टी 

कोल्हापूर/प्रतिनिधी

भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले महा परिक्षा पोर्टल मध्यप्रदेशातील व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्यसरकारने तातडीने महापोर्टल परीक्षा बंद करावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे येथील परिक्षा केंदावर वरील मागणी करीत आंदोलनही केले. दरम्यान दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती आता राजू शेट्टी यांनीही विरोध केल्याने भविष्यात या विरोधातील आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

 मंगळवारी पुणे येथील महापोर्टल केंद्रावर मोठा गोंधळ झाला. सर्व्हर बंद व इतर तांत्रिक अडचणीने परिक्षा बंद पडली. यावेळी ही परिक्षा सुरू असताना अनेक विद्यार्थी गुगलवरती ऑनलाईन पाहून पेपर सोडवले जात असल्याचे निदर्शनास आले. राज्यातून विविध कानाकोपऱयातून हजारो विद्यार्थी या परीक्षांसाठी आले होते. वास्तविक शासनाने ही परिक्षा त्याच्या प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी सेंटर देऊन घेणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरत असताना स्वतःच्या जिल्हय़ातील पर्यायी केंद्र दिले असताना देखील त्यांना इतर सेंटर देऊन परीक्षा घेतली जात होती.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी परिक्षा केंद्राला भेट देवून माहिती घेतली. पोर्टल हे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकले असून राज्यभरातील तरूणाई हे पोर्टल बंद करावे म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. एकच विद्यार्थी वेगवेगळय़ा ठिकाणी परिक्षेस बसताना आढळले असून काही विशिष्ट परिक्षा केंद्रे असे सुध्दा आहेत कि जी पुर्णतः मॅनेज झालेली असल्याचे पुराव्यासहित तक्रारी परिक्षर्थीनी केल्या काही उमेदवार चुकीच्या पध्दतीने पैसे भरून सेवेमध्ये रूजू झाल्याच्या तक्रारी आल्याचे शेट्टी यांनी या वेळी सांगितले.  या महापोर्टलच्या कार्यालय, अधिकारी  व पदाधिकारी यांचा कोणताच पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांना तक्रार करणे अडचणीचे झाले आहे.   

 राज्यामध्ये महायुतीच्या काळात पारदर्शक पध्दतीने महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थीची भरती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. तीन वर्षांत या पोर्टलअंतर्गत होणारी प्रत्येक परीक्षा वादग्रस्त आणि आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली खुप मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याच्या अनेक घटना याआधी समोर आलेल्या आहेत. यापुर्वीही स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने सदर महापोर्टल परिक्षा बंद करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. मात्र काहीच कारवाई झाली नाही.

 

Related posts: