|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News »   पुणे : तरुणीचा गळा आवळून निर्घृण खून

  पुणे : तरुणीचा गळा आवळून निर्घृण खून 

पुणे  / प्रतिनिधी  : 

सिंहगरोड परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळला असून, ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानंतर मंगळवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तिचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले असून, अंतिम अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाले आहेत का नाही, हे स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

तेजसा श्यामराव पायाळ (वय 29 वर्षे, मु. रा. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर रात्र झाल्याने शवविच्छेदन करण्यास नकार देण्यात आला होता. शवविच्छेदन मंगळवारी सकाळी करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चपे फिरवली. तेजसा ही बीड येथील मूळची राहणारी आहे. तिचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले असून, नोकरीच्या शोधासाठी ती पुण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड म्हणाल्या, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अहवालात गळा दाबल्याचे आणि अंगावर व्रण असल्याचे आढळले आहे. घरातील वस्तूंचाही पंचनामा केला गेला आहे. तपास सुरू केला असून प्रकरणाच्या मुळाशी लवकरच पोलीस पोहोचतील व आरोपी जेरबंद होईल.

 

 

Related posts: