|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » युवा पिढीने अवांतर वाचनावर भर द्यावा!

युवा पिढीने अवांतर वाचनावर भर द्यावा! 

मालवणात वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाची मुहूर्तमेढ

वार्ताहर / मालवण:

सध्या सोशल मिडीयातून आज आपल्याला रेडिमेड माहिती उपलब्धत होत आहे. या माहितीची सत्यता न तपासात ती स्विकारली जाते. सोशल मिडीयातून मिळालेली सर्व माहिती ही खरीच आहे असे युवा पिढीला वाटते. या  माहितीबाबत युवा पिढीने विचार करत नाही. युवा पिढीचे जर अवांतर वाचन असेल तर प्रत्येक गोष्टीवर ती विचार करू शकते. त्यामुळे युवा पिढीने नवनवीन पुस्तकांचे वाचन करावे व इतरांशी संवाद साधावा असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परूळेकर यांनी येथे बोलताना केले.

आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या युगात युवाई वाचनाकडे वळावी या हेतूने बॅ. नाथ पै सेवांगण येथील एसएम जेशी संकुल येथे वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. याप्रसंगी ऍड. परूळेकर हे बोलत होते. याप्रसंगी कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, तरूण भातरचे आवृत्ती प्रमुख विजय शेट्टी, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा. उज्ज्वला सामंत, चारूशिला देऊलकर, कवी रूजारिओ पेंटो आदि उपस्थित हेते.

आम्ही बी घडलो तुम्ही बिघडा

 वाचन संस्कृती विकास उपक्रमाबद्दल बोलताना सिद्धी वरवडेकर म्हणाली, व्हॉट्सअप, फेसबुकमुळे आजच्या युवा पिढीला नावे ठेवण्यात येतात. परंतु वाचन संस्कृती उपक्रमाद्वारे आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला. वाचनाबरोबरच काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी कृतीही केली जाते. कणकवलीत महामार्गाच्या कामामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ावर धुळ बसलेली होती. ही घटना जेव्हा आम्हाला समजली तेव्हा आमच्या ग्रुपमधील सर्वांनी तेथे जाऊन ती धुळ साफ केली. पल्लवी कोंकणी म्हणाली, उपक्रमासाठी मिंटींग घेणे, नियोजन करणे, वाचलेल्या साहित्यावर चर्चा करणे हे सारे व्हॉट्सअप ग्रुपवरच केले जाते. अमित राऊळ म्हणाला, वाचन संस्कृती विकासाचे रोपटे कणकवलीत रूजले. आज या रोपटय़ाची बीज आम्ही मालवणामध्ये घेऊन आलो आहोत. हे बीज रूजविण्याची जबाबदारी मालवणातील युवा पिढीची आहे. चिंतामणी सामंत म्हणाला, युवा पिढीचे नेतृत्त्व करण्यासाठी कुणी पुढे येईल याचा विचार करू नका, तर ती जबाबदारी प्रत्येक युवक व युवतीने घेतली पाहिजे. तुम्हीच नेतृत्त्व करा, मग बघा सर्वजण तुमच्या नेतृत्त्वात तुमच्या मागे येतील. यावेळी रेश्मा पवार, अंकिता सामंत यांनी मनोगते व्यक्त केली.

जिल्हय़ाची ओळख टिकवणे तुमच्या हाती

राजेंद मुंबरकर म्हणाले, प्रज्ञावंतांचा, बुद्धीवंतांचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो. परंतु अलिकडच्या काळात सिंधुदुर्गची ओळख बदलत चालली आहे. संस्कारी जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्गची ओळख टिकवणे हे सिंधुदुर्गच्या युवा पिढीच्या हातात आहे. साने गुरूजी, बॅ. नाथ पै, प्रा. मुधु दंडवते या सर्वांची चरीत्रे युवा पिढीला मार्गदर्शन करणारी आहेत. विद्यार्थ्यांनी या सर्वांची चरित्रे आर्वजून वाचावीत. विजय शेट्टी म्हणाले, कणकवलीत राजेंद्र मुंबरकर यांच्या पुढाकाराने कणकवलीत वाचन संस्कृती विकास या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. आज बॅ. नाथ पै सेवांगण, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, उज्ज्वला सामंत यांच्या प्रयत्नातून मालवणमध्ये वाचन संस्कृती विकास उपक्रमाला सुरूवात होत आहे. मालवणप्रमाणेच दोडामार्गमध्येही वाचन संस्कृती विकास कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. प्राचार्य मंडले म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक स्पार्क असतो. त्याची जाणीव त्याला होणे गरजेचे आहे. याच जाणीवेतून सकारात्मक बदल होतात. यावेळी प्रा. उज्वला सामंत, चारूशिला देऊलकर यांनी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन चारूशिला देऊलकर यांनी केले.

Related posts: