|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » संक्षिप्त महाराष्ट्र भरती

संक्षिप्त महाराष्ट्र भरती 

बीड पोलीस

एकूण पदे- 36

पद- पोलीस शिपाई चालक

पात्रता- बारावी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण- बीड

वयोमर्यादा-

खुला प्रवर्ग -19 ते 28 वर्षे

मागास प्रवर्ग- 19 ते 33 वर्षे

अर्जाचे शुल्क-

खुला वर्ग- 450 रुपये

राखीव वर्ग- 350 रुपये

शेवटची तारीख- 22 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट-
www.beedpolice.gov.in

नागपूर ग्रामीण पोलीस

एकूण पदे- 28

पद- पोलीस शिपाई चालक

पात्रता- बारावी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण- नागपूर ग्रामीण

वयोमर्यादा-

खुला प्रवर्ग- 19 ते 28 वर्षे

मागास प्रवर्ग- 19 ते 33 वर्षे

अर्जाचे शुल्क-

खुला वर्ग- 450 रुपये

राखीव वर्ग- 350 रुपये

शेवटची तारीख- 22 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.nagpurgraminpolice.gov.in

शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद

एकूण जागा-14

पद- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

प्राध्यापक- 5 पदे

सहयोगी प्राध्यापक- 9 पदे

नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद

शेवटची तारीख- 11 डिसेंबर 2019

अर्ज पाठवण्याचा पत्ता- शासकीय दंत महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद

अधिकृत वेबसाइट- www.gdchaurangabad.org

सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रूग्णालय, नांदेड

एकूण पदे- 28

पद- वैद्यकीय अधिकारी

नोकरीचे ठिकाण- नांदेड

शेवटची तारीख- 11 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाइट- www.nanded.gov.in

 

स्कॉलरशिप अलर्ट

फेअर अँड लव्हली करियर फाऊंडेशन स्कॉलरशिप

फेअर अँड लव्हली करियर फाऊंडेशन यावषी देखील भारतीय विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देणार आहे. ज्या विद्यार्थीनी पदवीच्या कोणत्याही वर्षात, कोणत्याही शाखेमध्ये आहेत जसं की बीए, बीएससी, बीकॉम, बीई, बीटेक, एलएलबी, बीफार्मसी, बीडीएस, बीएचएमएस, बीपीएड, बीएड, बीबीए किंवा या कोर्ससह पदव्युत्तर पदवी किंवा कोचिंग सेंटरमधून बँकिंग सेवेद्वारे, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, कॅट, एमबीए, सिव्हिल सर्व्हिसेस, आयआयटी, जेईई-इंजिनियरिंग, पीएमटी-एआयआय एमएस इत्यादींचे कोचिंग घेत आहेत, ते या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.      स्कॉलरशिपची निवड ऑनलाइन अर्ज आणि मुलाखतीवर आधारित असेल. दहावी आणि बारावीत 60 टक्के गुण मिळवलेल्या 15 ते 30 वयोगटातील विद्यार्थीनी आणि ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त नाही असे उमेदवार अर्ज करू शकतात.     अर्ज कसा करावा- इच्छुक विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.           

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 ते 50,000 रुपयापर्यंतची रक्कम दिली जाईल.         

शेवटची तारीख- 15 डिसेंबर 2019 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक -https://www.b4s.in/Tarun/FAL11

https://www.fairandlovelyfoundation.in

प्राइम मिनिस्टर स्कॉलरशिप स्कीम फॉर सेंट्रल आर्मड पोलिस फोर्स अँड असम रायफल्स 2019-20

या शिष्यवृत्तीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्सचे कर्मचारी कल्याण आणि पुनर्वसन मंडळाने (डब्ल्यूएआरबी) गृह मंत्रालय तसेच त्यांच्या अवलंबितांकडून अर्ज मागवले आहेत. या योजनेंतर्गत राज्य पोलिस कर्मचाऱयांना इंजिनियरिंग, मेडिसीन, डेण्टल, व्हेटर्नरी, बीबीए, बीसीए, बीफार्मा, बीएससी, एमबीए, एमसीए पदवी पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.           एकूण 2 हजार जणांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाणार आहे.

सीएपीएफ किंवा एआर ज्या कर्तव्यावर मृत्यू पावलेल्यांच्या विधवा किंवा कर्तव्यावरील अपंग, निवृत्त व सेवा देणारी सीएपीएफ, एआर कर्मचारी आश्रित, नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राज्य पोलिस कर्मचारी, ज्यांनी 12 वीच्या बोर्ड परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त केले आहेत इ. अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज कसा करावा- इच्छुक विद्यार्थिनी ऑनलाईन अर्ज करू शकतात.      

शिष्यवृत्ती/फायदेö निवडलेल्या मुलींना प्रति महिना 2 हजार 250 रुपये तर मुलांना 2 हजार प्रति महिना रक्कम शिष्यवृत्तीअंतर्गत दिली जाईल.

शेवटची तारीख- 15 डिसेंबर 2019 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक-     https://www.b4s.in/Tarun/PMS14

https://www.vikaspedia.in/education        

कॉलेज बोर्ड इंडिया स्कॉलर्स प्रोग्रॅम 19-20

बारावी, बारावीतील गुणवंत व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बोर्डातर्फे एसएटी परीक्षा शुल्कातून सूट दिली जात आहे. एसएटी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱया इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल हायर एज्युकेशन अलायन्स इान्स्टिटय़ूशन्स ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रॅम घेण्यासाठी संपूर्ण शिष्यवृत्तीही मिळेल. ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना, सॅट (एसईटी) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.     सत्र 2019-20 मध्ये, बारावीचे जे विद्यार्थी भारतात राहून शिकत आहेत आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी आहे तसेच परीक्षेत उत्कृष्ट रँकिंग (1350/1600) मिळालेला आहे असे उमेदवार संपूर्ण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील.        

अर्ज कसा करावा- इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतात.          

इयत्ता अकरावी व बारावीचे असे विद्यार्थी, ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना सॅट (एसईटी) परीक्षा शुल्कात 50 ते 90 टक्के सूट मिळेल. सर्वोत्कृष्ट रँकिंग प्राप्तकर्ता ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना ग्लोबल हायर एज्युकेशन अलायन्स इन्स्टिटय़ूशन्स ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रॅमसाठी संपूर्ण शिष्यवृत्ती मिळेल.    

शेवटची तारीख- 31 मे 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.b4s.in/Tarun/CBI2

https://www.collegeboard.org

Related posts: