|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » आगामी वर्षात कर्मचाऱयांच्या वेतन वृद्धीचे संकेत

आगामी वर्षात कर्मचाऱयांच्या वेतन वृद्धीचे संकेत 

कॉर्न फेरी ग्लोबल सॅलरी फोरकास्टच्या अहवालात माहिती

नवी दिल्ली

 नवीन वर्षात देशातील कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ 9.2 टक्क्यांनी होण्याचे संकेत असून ही आशियातील सर्वाधिक वाढ होण्याचा अंदाज आहे. परंतु यामध्ये महागाईचा अडथळा निर्माण होण्याची दाट शक्याताही कॉर्न ग्लोबल सॅलरी फोरकास्टच्या अहवालामधून नेंदवली आहे.

देशातील विविध क्षेत्रातील महागाई दराची तडजोड केल्यास कर्मचाऱयांना मिळणाऱया वेतनात फक्त 5 टक्क्यांची वृद्धी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी वर्षातील होणारी वेतन वाढ 9.2 टक्के असणार असून मागील वर्षासोबत तुलना केल्यास हा आकडा 10 टक्के वाढीपेक्षा कमी राहण्याचे अनुमान आहे.

भारताची स्थिती मजबूत

जागतिक पातळीवर कर्मचाऱयांच्या वेतनात मोठी घसरण असली तरीही भारतामधील वेतनवाढीचा आकडा मजबूत असल्याची माहिती कॉर्न फेरी इंडियाचे अध्यक्ष नववीन सिंह यांनी दिली आहे.

जागतिक वेतन वृद्धी 4.9 टक्क्यांवर?

जागतिक स्तरावर 2020 मध्ये कर्मचाऱयांच्या वेतनात 4.9 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ग्लोबल इंफ्लेशन रेटच्या अनुमानानुसार 2.8 टक्के, रियल वेज ग्रोथ एशियाच्या अंदाजनुसार 2.1 वेतन वाढ राहण्याचे संकेत आहेत. सर्वाधिक कर्मचाऱयांची वेतन वृद्धी आशियात राहण्याचा अंदाज असल्याने तो 5.3 टक्क्यांवर वाढण्याचे संकेत आहेत.  दुसऱया बाजूला रियल वेज सॅलरी 3.1 आणि महागाई दर 2.2 टक्के राहण्याचे संकेत आहे. इंडोनेशियातील 8.1 इतकी वेतनात वृद्धी राहणार असून मलेशियामध्ये 5, चीन 6 आणि कोरियात 4.1 टक्क्यांची वृद्धी राहण्याचे अनुमान आहे. जपानमध्ये वेतन वाढ 2 टक्क्यांवर राहण्याचे संकेत आहेत.

Related posts: