|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » क्रिसिलने जीडीपीचे अनुमान घटविले

क्रिसिलने जीडीपीचे अनुमान घटविले 

पूर्वी निश्चित केलेला 6.3 मध्ये घट करुन 5.1 वर राहण्याचे संकेत

नवी दिल्ली

 रेटिंग एजन्सी क्रिसिलकडून चालू आर्थिक वर्षातील आर्थिक विकासदराच्या (जीडीपी) अनुमानात घट नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर .1 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर या अगोदर हाच दर 6.3 टक्क्यावर जीडीपी राहणार असल्याचे अनुमान क्रिसिलने मांडले होते.

हे अनुमान  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) पतधोरण समिक्षेच्या अगोदर आले आहे. तर पतधोरणा संदर्भातील बैठक येत्या 5 डिसेंबरला होणार आहे. यात पुन्हा एकदा व्याजदर कपात करण्याची शक्यता असल्याचे अनेक अहवालामधून सांगण्यात आले आहे. याच बैठकीदरम्यान देशाचा आर्थिक विकास दराचे अनुमान सादर करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

29 नोव्हेंबर रोजी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडय़ानूसार चालू आर्थिक वर्षातील दुसऱया तिमाहीत जीडीपी 4.5 टक्क्यांवर आलेला आहे. हा दर बाजाराला अपेक्षित असे नसलेले आकडे असल्याचे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे. ताजा जीडीपीचा विचार केल्यास चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत देशाचा जीडीपी दर घटून 4.75 आल्याची नोंद करण्यात आली आहे. हा दर मागील अनेक दिवसांपासून खालच्या स्तरावर राहिलेला आहे.

दुसऱया सहामाहीतील जीडीपी?

औद्योगिक उत्पादन, वस्तुंची निर्यात, बँकांचे कर्ज वितरण, कर वसूली, वीज उत्पादन या सारख्या लहान क्षेत्रांनी केलेल्या कामगिरीमधून पुन्हा एकदा जीडीपी  घटत जात असल्याची नेंद क्रिसिलच्या अहवालामध्ये करण्यात आली आहे. दुसऱया तिमाहीमध्ये जीडीपीत काही प्रमाणात सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील अनुमान 6.9 टक्क्यांत घट करुन 6.1 टक्क्यांवर निश्चित केले आहे.

Related posts: