|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » दुसऱया दिवशी सेन्सेक्स 126 अंकानी घसरला

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 126 अंकानी घसरला 

बँकिंग, धातू-वाहन क्षेत्रात पडझडतः निफ्टी 11,994.20 वर बंद

वृत्तसंस्था / मुंबई

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यामधील समभागांच्या कमजोर वातावरणाचा परिणाम  शेअरबाजार झाला. त्यमुळे बाजार घसरणीसह बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 126.72 अंकानी घसरुन निर्देशांक 40,675.45 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 54.00 अंकानी घसरण होत 11,994.20 वर बंद झाला आहे.

 दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्स 40,885.03 चा उच्चांक गाठला असून 40,555.04 वर खालचा स्तर  गाठलेला आहे.

बीएसईमधील नऊ कंपन्यांचे समभाग हिरव्या निशाण्यावर राहिल्या आहेत. 21 कंपन्यांचे समभाग घसरण होत बंद झाल्या आहेत. याच दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजारात 11 कंपन्याचे समभाग घसरणीसह बंद झाले असून 11 कंपन्याच्या समभागांचा लिलाव झाला असून 39 कंपन्यांमधील समभागांची विक्री झालेली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये येस बँकेचे समभाग 7.81 टक्क्यांनी घसरले असून सोबत टाटा स्टील, वेदान्ता, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स यांचे समभाग 5.07 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे बजाज ऑटो, टीसीएस, कोटक बँक,  इन्फोसिस आणि एचडीएफसी यांचे समभाग मात्र वधारले आहेत.

आरबीआयच्या पतधोरण बैठकीकडे बाजाराचे लक्ष

येत्या 5 डिसेंबरपासून रिझर्व्ह बँकेची पतधोरणा संदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा रेपोदरात कपात होण्याची शक्यता असल्याचे मत मागील काही दिवसांपासून तज्ञांनी व्यक्त केले होते. यामुळे आर्थिक विकासाचा दर सुधारण्यासाठीची उपयायोजना,  उत्पादन क्षेत्र, बेरोजगारी, कृषीसह अन्य क्षेत्रांसाठी कोणती  घोषणा बैठकीत होण्याची शक्यता आहे. यामुळे ही बैठकीवरच भारतीय शेअर बाजाराचा कल  येत्या काळात निश्चित होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Related posts: