|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयव

माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयव 

मुंबई / प्रतिनिधी

माहीमच्या समुद्रकिनाऱयावर एक बेवारस सुटकेस सापडली असून त्यामध्ये मानवी शरीर म्हणजे हातापायांचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. हे मानवी शरीर एका पुरुषाचे असून याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही सुटकेस काळय़ा रंगाची असून अमेरिकन टुरिस्टर कंपनीची असून पाण्यावर तरंगताना ती आढळली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात  आणि गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय तसेच प्लास्टिकच्या काळय़ा पिशवीत पुरुषाचे कापलेले गुप्तांग आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शीर आणि धड काहीच नसल्याने हे हात आणि पाय कुणाचे आहेत हे  समजू शकलेले नाही.

माहीम दर्ग्याकडील पाठीमागच्या समुद्रकिनाऱयावर काही तरुणांना ही सुटकेस आढळली. सुटकेस जड लागल्याने त्यांनी उघडून पाहिले असता त्यात तुटलेले हात आणि पाय आढळले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुटकेस ताब्यात घेतली. दरम्यान, हे तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून सुटकेस टाकणाऱयाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: