|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » डोंबिवली स्थानकातील गर्दीचा प्रश्न दिल्लीदरबारी

डोंबिवली स्थानकातील गर्दीचा प्रश्न दिल्लीदरबारी 

खासदार सुप्रिया सुळे यांची प्रवासी संख्येच्या बरोबरीने लोकलची संख्या वाढवण्याची मागणी 

मुंबई / प्रतिनिधी

मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीच्या आणि मोक्याच्या डोंबिवली रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी सर्वज्ञात आहे. प्रवाशांकडून या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात अनेकवेळा मागण्या करण्यात आल्या होत्या. अशातच डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱया गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. दरम्यान, शून्य प्रहरमध्ये हा मुद्दा उपस्थित करायचा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले असून प्रवासी संख्येच्या बरोबरीने लोकलची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी लोकसभेत केली आहे.

डोंबिवली स्थानकातून दररोज सरासरी लाखो प्रवासी ये-जा करतात. सर्वाधिक  महसूल प्राप्त करून देणाऱया मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या यादीत डोंबिवली स्थानकाचा समावेश आहे. तरीही या स्थानकावरील वाढत्या गर्दीबाबत मध्य रेल्वेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे अनेकवेळा प्रवाशांकडून सांगण्यात आले. प्रवाशांकडून मध्य रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही याकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दीबाबत लोकसभेत मुद्दा उपस्थित करत यासंदर्भाचे पत्र सादर केले. या पत्रामध्ये काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या डोंबिवली-सीएसएमटी लोकलमध्ये होणाऱया गर्दीचा मुद्दा उपस्थित करताना डोंबिवली लोकल असून देखील डोंबिवली स्थानकातून न सुटता कल्याणहून सुटत असल्याचे सांगितले. त्यामुळे ट्रेन डोंबिवली स्थानकात येईपर्यंत गर्दीने भरून येत असल्याने डोंबिवलीतील प्रवाशांना बसण्यास जागा शिल्लक राहत नसल्याचे या पत्राद्वारे खासदार सुळे यांनी सांगितले. तसेच अनेकदा लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या असतात यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडतो. रेल्वे अधिकाऱयांकडे अनेकदा तक्रार करूनही काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचेही पत्रामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच यानंतर ट्विटरद्वारे ‘डोंबिवली लोकल ट्रेनमध्ये प्रमाणापेक्षा होणाऱया जास्त गर्दीचा आणि लोकल उशिराने धावण्याचा मुद्दा नियम 377 अंतर्गत उपस्थित केला आहे. तसेच डोंबिवलीकडे जाणाऱया आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱया लोकलची संख्या वाढवण्याबाबतची मागणी पेंद्राकडे केली आहे.’

Related posts: