|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कांद्याने केली दीडशे पार

कांद्याने केली दीडशे पार 

नवी मुंबई / प्रतिनिधी

अकाली पावसाचा परिणाम कांद्यावर झाल्यामुळे साहजिकच जुन्या कांद्याच्या भावात भरमसाठ वाढ झाली असून किरकोळ बाजारात जुन्या कांद्याला एक किलोमागे 150 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी महिलावर्ग जुना कांदा न घेता नवीन कांद्याची मागणी करत आहेत.

अकाली पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे त्याचा भाव चांगलाच वधारला. दिवाळीपासून ही परिस्थिती सुरू असून ती आजतागायत तशीच आहे. बाहेरील देशातून कांदा आयात केला गेला पण त्याची चव भारतीय कांद्यासारखी नसल्याने त्याला अपेक्षित मागणी नव्हती. नुकताच इजिप्तवरून 28 टन कांदा आयात केला. पण, त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला नसल्याचे व्यापरीवर्गाचे म्हणणे आहे.

मंगळवारी कृषी उत्पन्न बाजारपेठेत 70 ट्रक व टेम्पोद्वारे आवक झाली. तरीही आजचा महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा घाऊक बाजारपेठेत बाजारभाव 90 ते 120 रुपये प्रतिकिलो होता. तर नवीन कांद्याचा बाजारभाव 80 ते 100 रुपये प्रतिकिलो होता. त्यामुळे नवीन कांदा किरकोळ बाजारपेठेत सध्या 120 ते 130 रुपये दराने विकला जात आहे. तर जुना कांदा 140 ते 150 रुपये दराने विकला जात आहे.

सध्या पुणे,नगर,कर्नाटक,गुजरात येथून कांदा आयत होत आहे.परंतु तो कांदा नवीन हा ओला असल्यामुळे व त्याला अपेक्षित अशी चव नसने,सळपाट निघणे या प्रकारामुके त्या कांदाकडे महिलावर्ग पहातही नसल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.

जुना कांदा अपेक्षेप्रमाणे येत नाही. बाहेरील देशातून आणलेल्या कांद्याला चव नाही. यातच महाराष्ट्र व भारताच्या विविध भागातून आलेल्या कांद्याला चव नसल्याने त्यांना मागणी कमी आहे. त्यामुळेच जुन्या कांद्याला कधीही अपेक्षा केली नाही. त्यापेक्षा भावाने उच्चांक गाठला आहे.

मनोहर तोतलानी, व्यापारी

कांदा बटाटा मार्पेट, मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ

Related posts: