|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल : चिदंबरम

अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल : चिदंबरम 

नवी दिल्ली

तिहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी ट्विटरवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत जीडीपीवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल’, असे ट्विट केले आहे. जीडीपीच्या आकडय़ांना आता काहींच अर्थ राहिला नसून वैयक्तिक करामध्ये कपात होईल, आयात शुल्कात वाढ होईल. सुधारणेबाबत भाजपचा असा विचार आहे, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

लोकसभेत कॉर्पोरेट करावरून चर्चा सुरू असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खोचक वक्तव्य केले होते. जीडीपीला रामायण, महाभारत किंवा बायबलशी तुलना करणे योग्य नाही. तसेच भारतासाठी जीडीपीचा कोणताच अर्थ राहिला नाही. भविष्यात जीडीपीचा फारसा काही उपयोग होऊ शकणार नाही. सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक विकास होत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे असून, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वक्तव्य केले होते.

Related posts: