|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘विशेष सुरक्षा’ विधेयक संसदेत संमत

‘विशेष सुरक्षा’ विधेयक संसदेत संमत 

सुरक्षा हे प्रतिष्ठेचे चिन्ह मानू नये : अमित शहा यांची टिप्पणी, गांधी कुटुंबाला आता झेड प्लस सुरक्षा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘विशेष सुरक्षा’ गट कायद्यात सुधारणा करणाऱया विधेयकाला संसदेची संमती मिळाली आहे. मंगळवारी हे विधेयक राज्यसभेनेही संमत पेले. ते लोकसभेत यापूर्वीच संमत झाले आहे. यामुळे आता विशेष सुरक्षा गटाची सुरक्षा (एसपीजी) राष्ट्रपती आणि पंतप्रधान व त्यांचे कुटुंबीय यांनाच मिळणार आहे. तसेच ती पाच वर्षांसाठी माजी पंतप्रधान व त्यांच्या समवेत राहणाऱया निकटच्या कुटुंबियांनाही दिली जाणार आहे. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व गांधी कुटुंबातील इतरांना ती मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

सुरक्षा व्यवस्था ही आवश्यकता असते. ते प्रतिष्ठाचिन्ह म्हणून कोणी मिरवू नये. हे विधेयक व्यापक हेतूने आणण्यात आले असून केवळ गांधी कुटुंबियांना लक्ष्य करण्यासाठी नाही. तसेच त्यामागे राजकीय सूडबुद्धीही नाही. ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे, त्यांना ती देण्यात आली आहेच, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकाचे समर्थन करताना राज्यसभेत केले.

विरोधी पक्षांचा सभात्याग

गांधी कुटुंबियांची विशेष सुरक्षा हटविल्याचा निषेध करण्यासाठी राज्यसभेतून काँगेस, द्रमुक व इतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला. सरकारचा या विधेयकामागचा हेतू राजकीय असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी कुटुंबियांचा धोका अद्याप कमी झालेला नाही हे प्रियांका गांधींच्या निवासस्थानी घडलेल्या प्रकारामुळे स्पष्ट होत आहे. तरीही सरकारचा हे विधेयक आणण्याचा हट्टाग्रह आहे, अशी टिप्पणी काही विरोधी सदस्यांनी केली. विरोधकांना संरक्षण न देण्याची सरकारी भूमिका लोकशाही संकेतांच्या विरोधात आहे, अशी टीकाही झाली.

ती गाडी काँगेस नेत्याचीच

सोमवारी प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात एका अनोळखी कारने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. प्रथम प्रियांका गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी राहुल गांधी काळय़ा रंगाच्या गाडीतून येत आहेत, असा संदेश आला. मात्र राहुल गांधी येण्याच्याच वेळी आणखी एक काळय़ा रंगाची गाडी प्रवेशद्वारातून आत आली. ही गाडी मीरतच्या काँगेस नेत्या शारदा त्यागी यांची होती हे नंतर स्पष्ट झाले, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

चौकशीचा आदेश

प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी तीन सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काँगेसचे समाधान झालेले नाही.  

निर्गुंतवणुकीतून मोठा लाभ

राज्यसभेतील आणखी एका महत्वाच्या चर्चेत निर्गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर खडाजंगी झाली. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात निर्गुंतवणुकीतून सरकारला 2 लाख 79 हजार 622 रुपये मिळाले. तर त्या आधीच्या मनमोहनसिंग सरकारच्या काळात 10 वर्षांमध्ये केवळ 1 लाख 7 हजार 833 कोटी रुपये मिळाले, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. गेल्या पाच वर्षांत निर्गुंतवणुकीचे 21 व्यवहार करण्यात आले. 2019 च्या आर्थिक वर्षात लक्ष्य 1.05 लाख कोटी रुपयांचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.  

विशेष सुरक्षा सुधारणा तरतुदी

ड विशेष सुरक्षा गट सुरक्षा आता केवळ पंतप्रधान व राष्ट्रपतींनाच

ड माजी पंतप्रधान व निकटचे नातेवाईक यांना 5 वर्षांपर्यंत सुरक्षा

ड राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या नातेवाईकांनाही विशेष सुरक्षा कवच

ड गांधी कुटुंबीय यापुढे विशेष सुरक्षा कवचाच्या बाहेर असणार

Related posts: