|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दोन-तीन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता

दोन-तीन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरासह तालुक्यामध्ये सोमवारी रात्री ऐन थंडीत अवकाळी पाऊस कोसळल्याने आंबा बागायतदार पुन्हा धास्तावले आहेत. सोमवारी दुपारपासून असणाऱया ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता होती. अशावेळी रात्री अचानक पाऊस पडल्याने डिसेंबरमध्ये पावसाच्या आगमनाने सारेजण अवाप् झाले. दरम्यान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मध्यम ते किरकोळ पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  भारतीय हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. तरीही कमाल तापमान वाढत आहे. त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या सोबतच ढगांचा गडगडाट होण्याचीही दाट शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये दक्षिण, पश्चिम †िदशेला कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या 3 दिवसात चक्रीवादळामध्ये रुपांतर झाल्यास ते सोमालियाच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीसह औरंगाबाद, परभणी, बीड, जालना, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related posts: