|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तरूण भारत’चा 24 वा वर्धापन दिन 9 डिसेंबर रोजी

तरूण भारत’चा 24 वा वर्धापन दिन 9 डिसेंबर रोजी 

‘तरूण भारत सन्मान’चे वितरण, -‘अस्मिता स्वरसंध्या’चे खास आकर्षण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपत रत्नागिरीकरांच्या मनात घर करणाऱया ‘तरूण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 24 वा वर्धापनदिन सोमवार 9 डिसेंबर रोजी साजरा होत आह़े यानिमित्त जयेश मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांसह वाचक, हितचिंतक, जाहिरातदारांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा रंगणार आह़े. या कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे सर्वच्या सर्व महिला कलाकारांचे सादरीकरण असलेला ‘अस्मिता स्वरसंध्या’ हा सांगितीक कार्यक्रम.

शतक महोत्सव साजरा करणाऱया ‘तरूण भारत’ रत्नागिरी आवृत्ती 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. अचुक व विश्वासार्ह बातमीच्या जोरावर ‘तरूण भारत’ने जिह्यातील अग्रगण्य दैनिकाचा मान मिळवला आह़े सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील वृत्तांना उत्तम प्रकारे प्रसिद्धी देऊन न्याय देणारा ‘तरूण भारत’ रत्नागिरीकरांचे हक्काचे व्यासपीठ बनले आह़े रत्नागिरी आवृत्ती 24 वर्षे पूर्ण करत असल्याचे निमित्त साधून 9 डिसेंबर रोजी वर्धापन दिन व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल कार्यालय येथे सायंकाळी 4 ते 9 या वेळेत वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे वर्धापनदिनानिमित्त अभ्यासपूर्ण व संग्राहय़ विशेषांक प्रसिद्ध करण्याची परंपरा यावर्षीही ‘तरूण भारत’ने जपली आहे. यावर्षीच्या विशेषांकासाठी ‘डिजिटल विश्व’ हा विषय निवडण्यात आला असून या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे समाजाला प्रकाशवाटा दाखवणाऱया काही निवडक व्यक्तींचा, संस्थांच्या कार्याचा गौरव ‘तरूण भारत सन्मान’ पुरस्काराने करण्यात येणार आह़े

सायंकाळी 9 वा. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी गायक-वादक-निवेदक अशा सर्व भूमिकांमध्ये बालकांनी सादरीकरण केले होते. त्याला उपस्थितांची मोठी दाद मिळाली होती. यावेळीही वेगळी संकल्पना घेऊन कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. गायक-वादक-निवेदक या सर्व भूमिकांमध्ये महिला कलाकार असलेला रत्नागिरीतील पहिला-वहिला कार्यक्रम ‘अस्मिता स्वरसंध्या’ उपस्थितांना मेजवानीच ठरणार आहे.

सायंकाळी 6 व़ा ‘अस्मिता स्वरसंध्या’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यावर्षी नोव्हेबर महिन्यात ‘तरूण भारत’ने महिलांसाठीचे हक्काचे व्यासपीठ ‘अस्मिता’ रत्नागिरीत सुरू केले आह़े त्याचे औचित्य साधून महिलांनी सादर केलेला विशेष कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आह़े या कार्यक्रमात वेगवेगळ्य़ा 6 महिला गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत़  त्याला साथ देणाऱया केवळ महिलाच आहेत़  निवेदनाचे कामही महिला करणार आहेत़ ‘तरूण भारत’ प्रती वाचक, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांचा असलेला स्नेह अधिक दृढ करण्यासाठी वर्धापनदिनी आयोजित स्नेहमेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन ‘तरूण भारत’ परिवाराने केले आह़े

Related posts: