|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » मोबाईल पोर्टेबिलिटी सेवा 10-15 डिसेंबरपर्यंत बंद

मोबाईल पोर्टेबिलिटी सेवा 10-15 डिसेंबरपर्यंत बंद 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवा भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोप्रिय आहे. यामध्ये ग्राहकांना मोबाईल नंबर न बदलता आपली दूरसंचार कंपनी बदलण्याची सुविधा मिळते. जर ग्राहकांना मोबाईल कंपनी बदलावयाची असल्यास मोबाईलवर युनिक पोर्टिग कोड(यूपीएस) जनरेट होतो. त्यानंतर ग्राहकांना आपल्याला हव्या त्या कंपनीची सेवा वापरता येते. ही सुविधा घेण्यासाठी कंपनीला  दूरसंचार रेग्युलेटरी ऍथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीचे नियमावलीत बदल करणार आहे. यासाठी पोर्ट करण्यात येणारी सुविधा 10 ते 15 डिसेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. कारण या कालावधीत नवीन नियमावलीची चाचणी घेण्यात येणार आहे.

ट्रायकडून बदल

?          पोर्टेबिलिटीसोबत जोडलेले नवीन 16 डिसेंबरच्या रात्री 12 पासून लागू होणार

?          ट्रायच्या माहितीनुसार 9 डिसेंबरच्या 5.59 सायंकाळी अर्ज दाखल करणाऱयांना  उपलब्ध नियमावलीत सेवा मिळणार आहे.

?          एकूण 16 डिसेंबरपर्यत रात्री 12 वाजेपर्यत नवीन कोणताही अर्ज जमा होणार नाही.

?          नंबर पोर्ट करण्यास फक्त दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार

? दुसऱया विभागातील नंबर पोर्ट करण्यास मात्र लागणार पाच दिवस लागणार आहेत.

Related posts: