|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » 92 हजाराहून अधिक कर्मचारी घेणार व्हीआरएस

92 हजाराहून अधिक कर्मचारी घेणार व्हीआरएस 

बीएसएनएल-एमटीएनएल : 11 डिसेंबर व्हीआरएसकरीता अंतिम दिवस

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपनीच्या 92,678 कर्मचाऱयांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा (व्हीआरएस) पर्याय निवडला आहे. यामुळे वार्षिक 8,800 कोटी रुपयाची बचत होण्याचा अंदाज आहे. तरी कर्मचाऱयांना व्हीआरएस योजनेत अर्ज दाखल करण्याची मंगळवारपर्यंत अंतिम मुदत होती.

बीएसएनएलचे वार्षिक  7 हजार कोटीची बचत

बीएसएनएलचे 78,300 आणि एमटीएनएलचे 14,378 कर्मचाऱयांनी कंपनीकडून व्हीआरएस घेतलेला आहे. यामुळे बीएसएनएलचे 50 टक्के आणि एमटीएनएलचे 76 टक्के कर्मचारी कमी झाले आहेत. तर व्हीआरएस शिवाय जवळपास 6 हजार अन्य कर्मचारीही यादरम्यान सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष पी के पुरवार यांनी दिली आहे. या कारणामुळे कंपनीचा वेतन-भत्त्याचा खर्च वर्षाला 14 हजार कोटी रुपयांनी घटून 7 हजार कोटी रुपयावर स्थिरावणार आहे.

कर्मचाऱयांची संख्या घटल्यावर वार्षिक वेतनाचा खर्च 2,272 कोटी रुपयानी घटून 500 कोटीवर राहणार आहे. या शिवाय फक्त 4,430 कर्मचारी राहिलेले आहेत. इतकेच कर्मचारी कंपनी चालवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे एमटीएनएलचे व्यवस्थापकीय संचालय सुनील कुमार यांनी सांगितले.

तोटय़ाचा प्रवास

बीएसएनएल कंपनीला 2018-19 मध्ये 14,904 कोटी रुपयाचा तोटा झाला होता. याच काळात एमटीएनएलला 3,398 कोटीच्या नुकसानीत राहावे लागले होते. यामुळे दोन्ही कंपन्यांवर एकूण 40 हजार कोटी रुपयाचे कर्ज झालेले आहे.

Related posts: