|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग » रेनॉन इंडिया गुजरातमध्येउभारणार बॅटरीचा कारखाना

रेनॉन इंडिया गुजरातमध्येउभारणार बॅटरीचा कारखाना 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात ऑटोमोबाईल क्षेत्राला सर्वाधिक गती येत्या काळात बॅटरीमुळे होणार आहे. यात इलेक्ट्रिक वाहनांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये बॅटरीची निर्मिती करणारा व्यापार वाढविण्यास मदत मिळणार आहे. याकरीता भारतात रेनॉन इंडिया व जेव्ही इव्ही अहमनी कंपनी संयुक्तपणे उत्पादन करणार आहेत.

कस्टमाइज्ड बँटरी पॅक्स बनविण्यासाठी जेवी कंपनीमध्ये 3.7 दशलक्ष अमेरिकन डॉलर(26 कोटी रुपये) संयुक्तपणे गुंतवणूक करण्यात आली आहे. जेव्हीएस सूरत, गुजरातमध्ये 200 मेगावॅट प्रति वर्षाची क्षमता असणारी एक बॅटरीचा कारखाना विकसित करत आहे. जो आगामी वर्षांमध्ये 1 गीगावॅट विस्तारीत होणार आहे. अत्याधुनिक आणि विश्वसनीय बॅटरी पॅक्सची निर्मिती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तर मागील 20 वर्षांपासून बॅटरीची निर्मिती करण्यात आम्ही काम करत असल्याचे सीईओ टी.सी.पुंग यांनी म्हटले आहे.

Related posts: