|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » व्याजदर कपातीच्या आशेने बाजारात चढउतार

व्याजदर कपातीच्या आशेने बाजारात चढउतार 

सेन्सेक्स 175 अंकानी तेजीतः निफ्टी 12,037.30 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई  

मुंबई शेअर बाजरात (बीएसई) रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीच्या अगोदर एक दिवस बाजारात चढउताराचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामुळे पतधोरण बैठकीत आज सलग सहाव्यांदा रेपोदर कपात करण्याच्या शक्यतेमुळे अंतिमक्षणी बाजारात बँकिंग वाहन आणि आयटी यांच्या समभागात विक्री झाल्यामुळे तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

बुधवारी बीएसईचा सेन्सेक्स दिवसअखेर 174.84 अंकनी वधारुन निर्देशांक 40,850.29 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 43.10 अंकाची तेजी नोंदवत 12,037.30 वर बंद झाला आहे.  आयसीआयसीआय बँक 4 , येस बँक 6 टक्क्यांच्या जवळ तर टाटा मोटर्सचे 7.1  आणि स्टेट बँकेचे समभाग 1.7 टक्क्यांनी वधारले आहेत. 

आयटीमध्ये काहीशी चमक राहिलली आहे. कारण सेवा क्षेत्रात नोव्हेंबरमध्ये वेग पकडल्याची माहिती एका अहवालामधून सादर करण्यात आली आहे. यामुळेच  टेक महिंद्रा 1.66 इन्फोसिस कंपन्यांचे समभागानी 1.39 टक्क्यांनी तेजीची नोंद केली असल्याचे दिसून आले आहे. 

बैठकीवर बाजाराचा कल

रिझर्व्ह बँकेची आज पतधोरणा संदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये सलग सहाव्यादा व्याजदर कपात होण्याची शक्यता अनेक आर्थिक अहवालामधून मांडण्यात आली आहे. यामुळे बुधवारी दिवसभरात बाजारात चढउतार राहिल्यानंतर अंतिम क्षणी बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे.

आज आरबीआय बैठकीत सकारात्मक निर्णय सादर झाले तर   त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. तर दुसऱया बाजूला अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धावर योग्य तोडगा निघण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव निवळल्यास त्याचा फायदा देशातील बाजाराला होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Related posts: