|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जलजन्य आजार रोखणाऱया 763 ग्रा.पं.चा होणार सन्मान

जलजन्य आजार रोखणाऱया 763 ग्रा.पं.चा होणार सन्मान 

अहवाल शासन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सलग पाच वर्षे एप्रिल 2014 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या जलजन्य साथींचा उद्रेक झालेला नाही, अशा जिल्हय़ातील 763 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. त्या बाबतचा अहवाल शासन मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.

जलजन्य साथींचे आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागांकडून वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण केले जाते.  पावसाळय़ानंतर ऑक्टोबर व पावसाळय़ापूर्वी एप्रिलमध्ये हे सर्वेक्षण केले जाते. त्यामध्ये सलग 5 वर्षे कोणत्याही प्रकारच्या जलजन्य साथीचा उद्रेक झालेला नाही. त्या ग्रामपंचायतींमधील सर्व जलस्त्रोतांना सलग 5 वर्षे हिरवे कार्ड दिले जाते.  त्यासाठी ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याहस्ते चंदेरी कार्ड देऊन गौरव करण्यात येतो. 

एप्रिल 2013 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत जिल्हय़ातील 845 ग्रामपंचायतींमध्ये तर एप्रिल 2014 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत 763 ग्रामपंचायतींमधील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी सलग 5 वर्षे कोणत्याही प्रकारच्या जलजन्य साथींचा उद्रेक झालेला नाही. मात्र गेल्या 5 वर्षात साथ उद्रेक न झालेल्या 763 ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड देऊन सन्मानित करण्यासाठीचा अहवाल शासन मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.  

सलग 5 वर्षे उद्रेक झालेल्या ग्रामपंचायती

गेल्या पाच वर्षात साथरोगाचा सातत्याने उद्रेक झालेल्या 5 ग्रामपंचायतींमध्ये बोरज,  बामणोली, शिवणे, खानू, शिरवली यांचा समावेश आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर तेथील जलस्त्रोतांची तातडीने पाणी स्वच्छताविषयक खबरदारी घेऊन जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात आले आहे.  

जिल्हय़ात चंदेरी कार्ड पात्र ग्रामपंचायतींची आकडेवारी पुढीलप्रमाणेः

तालुका         ग्रामपंचायतींची संख्या

मंडणगड              45

दापोली               103

खेड                  99

गुहागर               52

चिपळूण               112

संगमेश्वर              117

रत्नागिरी              80

लांजा                 54

राजापूर               101

 

Related posts: