|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिस्कीट आणण्यासाठी गेलेली महिला बेपत्ता

बिस्कीट आणण्यासाठी गेलेली महिला बेपत्ता 

प्रतिनिधी/ बेळगाव

लहान मुलीला बिस्कीटे आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरलेली गुजरातमधील एक महिला बेपत्ता झाली आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून यासंबंधी रेल्वे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पद्मा जितेंद्र जैन (वय 23, रा. सुरत, गुजरात) असे त्या महिलेचे नाव आहे. 2 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. पद्मा आपल्या अन्य नातेवाईंकांसोबत हुबळीहून सुरतला जात होती. जोधपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करताना 2 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली.

त्यावेळी पद्मा लहान मुलीला बिस्कीट आणण्यासाठी रेल्वेतून खाली उतरली. खिडकीतून तीने रेखा जैन या आपल्या नातेवाईकाला बिस्कीट दिले. त्यावेळी रेखाने तिला रेल्वेत चढण्याचे सांगितले. तोपर्यंत रेल्वे तेथून सुटली. मिरजपर्यंत जाऊन रेखाने आपल्या अन्य नातेवाईकांना ही घटना कळविली.

मंगळवारी यासंबंधी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 5 फूट उंची, अंगाने सुदृढ, गहू वर्ण असे तिचे वर्णन आहे. तिने आपल्या डाव्या हातावर इंग्रजीत जान असे गेंदवून घेतले आहे. या महिलेची माहिती मिळाल्यास 0831-2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: