|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रा. द. तु. पाटील यांच्या चैत कादंबरीला लोकमंगल साहित्य पुरस्कार

प्रा. द. तु. पाटील यांच्या चैत कादंबरीला लोकमंगल साहित्य पुरस्कार 

बेळगाव / प्रतिनिधी

सोलापूर येथील लोकमंगल समुहातर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार बेळगावातील ज्योती कॉलेजमधील प्राध्यापक द. तु. पाटील यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘चैत’ या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. येत्या दि. 14 डिसेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱया समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी नाटय़ व सिने कलावंत किशोर कदम (सौमित्र) उपस्थित राहणार आहेत.

द. तु. पाटील यांनी ग्रामीण जीवनाविषयी लिहिलेली ‘चैत’ ही कादंबरी लोकप्रिय असून, त्यांच्या या कादंबरीमध्ये वास्तववादी ग्रामीण जीवनाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

Related posts: