|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शामराव देसाई हे फुले -आंबेडकरांचे वैचारिक वारसदार

शामराव देसाई हे फुले -आंबेडकरांचे वैचारिक वारसदार 

बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी फुले, शाहू , आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वैचारिक चळवळ उभी केली. ही चळवळ बेळगावमध्ये उभी करून येथील बहुजन समाजाला शिक्षण देऊन सज्ञान करण्याचे काम राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांनी केले. त्यामुळे सत्यशोधक वृत्तीचे असणारे शामराव देसाई हे महात्मा फुलेंचे वैचारीक वारसदार आहेत, असे प्रतिपादन ज्ये÷ विचारवंत व लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

राष्ट्रवीरकार कै. शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावषीचा पुरस्कार स्वीकारल्यावर डॉ. साळुंखे बोलत होते. व्यासपीठावर कोल्हापूर येथील ज्ये÷ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, राष्ट्रवीरचे संपादक ऍड. राजाभाऊ पाटील, माजी प्राचार्य आनंद मेणसे, प्राचार्य अनंत देसाई, प्रकाश मरगाळे, शिवाजी देसाई उपस्थित होते.

घोंगडय़ाची आठवण सदैव राहील

आजवर अनेक पुरस्कार स्वीकारले पण या पुरस्कारासोबत मिळालेल्या घोंगडय़ामुळे अनेक बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आपली नाळ ही मातीशी असते हे यातून एकदा स्पष्ट झाले. बेळगावच्या अनेक आठवणी या माझ्या कायम सोबत राहतील. बेळगावमध्ये कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला पण येथील श्रोत्यांनी तो परतवून व्याख्यान ऐकले. त्यामुळे बेळगावकरांचा हा सन्मान कायम लक्षात राहील असे त्यांनी सांगितले.

 डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले. ऍड. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी परिचय करून दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Related posts: