|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दडपशाही किंवा अटी न लादता दिला जातो निकाल

दडपशाही किंवा अटी न लादता दिला जातो निकाल 

14 रोजी लोकअदालत भरविणार : जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव व न्यायाधीश आरस यांची माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

कुणावरही दडपशाही किंवा इतर कोणत्याही अटी न लादता आम्ही वादी आणि प्रतिवादीला समोरासमोर बसवून खटले निकालात काढतो. गोरगरीब जनतेला विनामूल्य आणि जलद निकाल देण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच दोन ते तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. 14 डिसेंबर रोजी लोकअदालत भरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव आणि न्यायाधीश विजय देवराज आरस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोणताही खटला दाखल केल्यानंतर पक्षकारांना न्यायालयाच्या पायऱया झिजवाव्या लागतात, म्हणून सर्वसामान्य जनता न्यायालयाकडे येत नाही. बऱयाच वेळा नुकसानभरपाई मिळाली नाही तरी खटला दाखल करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राष्ट्रीय लोकअदालत भरविली जात आहे. या लोकअदालतीमधून मोठय़ा प्रमाणात खटले निकालात काढले जातात. यामध्ये चेक बाऊन्स, कर्ज, विमा नुकसानभरपाई, अपघातातील जखमी किंवा मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचे खटले, भू-स्वाधीन खटले याचबरोबर नुकसानभरपाई संदर्भातील इतर खटले सोडविण्यात येतात. कौटुंबिक न्यायालयातील खटलेही समझोत्याने सोडविले जात आहेत.

…तर वरिष्ठ न्यायालयात पुन्हा खटला दाखल नाहाr

पक्षकारांना विनामूल्य आम्ही निकाल देतो. हा निकाल देताना पक्षकारांना समोरासमोर बसवून तोडगा काढला जातो. या ठिकाणी एकदा जर खटला निकाल लागला तर त्या निकालाविरोधात वरि÷ न्यायालयातही पुन्हा खटला दाखल होऊ शकत नाही, असे सचिव विजय देवराज आरस यांनी सांगितले. तेव्हा नागरिकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्टेट बँकमधील थकीत कर्जदारांना 50 टक्के सूट

14 डिसेंबर रोजी बेळगावसह संपूर्ण जिह्यामध्ये लोकअदालत भरविली जाणार आहे. यावषी पुरामुळे मोठय़ा प्रमाणात सर्वसामान्य जनतेची हानी झाली आहे. थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करण्यासाठी स्टेट बँकने सध्या असलेल्या कर्जामध्ये 50 टक्के रक्कम सूट दिली जाणार आहे. तेव्हा स्टेट बँकमधील थकीत कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. 

Related posts: