|Saturday, February 29, 2020
You are here: Home » उद्योग » विप्रोने ऑस्टेलियामध्ये सुरु केले सायबर सुरक्षा केंद्र

विप्रोने ऑस्टेलियामध्ये सुरु केले सायबर सुरक्षा केंद्र 

नवी दिल्ली :  

भारतामधील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडने आपला विस्तार देशासोबत विदेशातही केला आहे. यावर सध्या ऑस्टेलियामधील मेलबर्न या ठिकाणी सायबर सुरक्षा केंद्र सुरु करण्याची घोषणा केली आहे. तर लवकरच ऑस्टेलियामधील अन्य शहरांमध्ये अशाप्रकारची केंद्र उभारणार असल्याचे म्हटले आहे. या केंद्राचा वापर सरकारी संघटनाना डिजिटल सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शेअर बाजाराला माहिती देताना विप्रोने म्हटले आहे, की आगामी आवृत्ती असणारे सायबर सुरक्षा केंद्र कंपनीने सुरु केल्याची माहिती दिली आहे. कर्मचाऱयांमधील ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्थानिकांना  अधिकची रोजगार प्राप्ती होण्यासाठी ही केंद्र उभारण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

 

 

Related posts: