|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भूसंपादन, निधीच्या मंजूरीनंतरही कामण-बापाणे रस्ता रखडला

भूसंपादन, निधीच्या मंजूरीनंतरही कामण-बापाणे रस्ता रखडला 

‘सरकारी काम नी सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. मात्र, या म्हणीवर कुरघोडी करून ‘सरकारी काम नी वीस वर्षे थांब’ असा अजब प्रकार वसई पूर्वेकडील कामण-बापाणे रस्त्याबाबत घडला आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन आणि निधी मंजूर झाला असतानाही या रस्त्याचे काम रखडले आहे.

वसई पूर्वेतील भागात कामण-बापाणे परिसर आहे. या भागातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग यांना जोडणारा कामण ते बापाणे असा रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्याच्या कामासाठी वीस वर्षांपूर्वी जागेचे भूसंपादन होऊन यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. सध्या हा रस्ता वसई-विरार महापालिकेच्या विकास आराखडय़ात नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता महापालिकेतर्पे बनविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कामण-बापाणे असा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्य़ात या भागात चिखल होत असल्याने नागरिकांना येथून पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच, कामण व इतर भागांत राहणाऱया नागरिकांना सध्या चिंचोटीवरून वळसा घालून प्रवास करावा लागतो यासाठी कामण ते बापाणे असा सरळ रस्ता करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. जर हा रस्ता तयार झाला तर कामण, पोमण, नागले, शिल्लोत्तर यासह इतर भागांत राहणाऱया नागरिकांना नायगाव स्थानक व इतर ठिकाणी पोहचण्यासाठी सोयीचे होणार असून वेळेची बचत होणार आहे, असे रस्ता संघर्ष समितीचे केदारनाथ म्हात्रे यांनी केला आहे. आतापर्यंत महापालिकेने केवळ या  रस्त्याचे डिजिटल सर्वेक्षण करून सीमांकने करून ठेवली आहेत. त्यालाही काही महिन्यांचा कालवधी उलटून गेला, तरीही पालिकेने कोणतीच पावले उचलली नसल्याने रस्त्याच्या कामाची सुरुवात होऊ शकली नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

Related posts: