|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सिनीयर सिटीझन : वृद्धांवरील हल्ल्यांचे वास्तव मांडणारा चित्रपट

सिनीयर सिटीझन : वृद्धांवरील हल्ल्यांचे वास्तव मांडणारा चित्रपट 

प्रतिनिधी / कोल्हापूर

    सिनीयर सिटीझनच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या गंभीर बनत चालला आहे. या वास्तववादी प्रश्नावर भाष्य करणारा ‘सिनियर सिटीझन’ हा चित्रपट शुक्रवार (13 डिसेंबर) रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकाचवेळी राज्यातील 200 थेअटरमध्ये हा चित्रपट झळकणार असल्याची माहिती चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर राजू सावला यांनी दिली.

   गुरूवारी सायंकाळी सिनीयर सिटीझन चित्रपटातील कलाकार कमलेश सावंत, किरण तांबे, सुयोग गोऱहे, आशिष पवार, अमोल जाधव, हर्षल पवार, सुयोग गोरे, या कलाकारांनी दैनिक तरुण भारत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तरुण भारतचे संस्थापक संपादक (कै.) बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

     ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटातून दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आजच्या भेसूर परिस्थतीचे वास्तववादी वर्णन या चित्रपटात केले आहे. निवृत्त लषकर अधिकारी अभय देशपांडे आपल्या पत्नीसोबत निवृत्तीनंतरचे निवांत आयुष्य जगत असतात. मात्र समाजात सिनीयर सिटीझनवर होणारे हल्ले पाहून देशपांडे दाम्पत्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होते यावर हे कथानक असल्याचे सावला यांनी सांगितले. सध्या बडय़ा शहरांमध्ये एकाकी राहणाऱया वृद्ध नागरीकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. हे लोण छोटय़ा छोटय़ा शहरांमध्येही पसरत आहे. या गंभीर समस्येवर या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील गाणी अंबरीश देशपांडे यांनी शब्दबद्ध तर अभिजित नार्वेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर दर्शना मेनन, विनय मांडके यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. माधुरी नागानंद व विजयकुमार नारंग निर्मित या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, स्मिता जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

    भविष्यात खलनायकाची भूमिका करण्यास आवडेल. माझी शरिरयष्टीमुळे मला  पोलीसांच्या भूमिका सर्वाधिक मिळाल्या. आपल्या देहयष्टीमुळे पोलीसांच्या भूमिकेचे निम्मे काम होवून जाते. त्यामुळे मला जास्तीत जास्त लक्ष भूमिकेवर केंद्रीत करता येते. असे मत अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केले.

मराठी चित्रपटांवरील जिएसटी कमी करा

   मराठी चित्रपटांना सध्या 18 टक्के जिएसटी आकारला जातो. चित्रपट निर्मीतीमधून  निर्मात्यास सरासारी 40 टक्के उत्पन्न मिळते. मात्र यातील निम्मी रक्कम सध्या जिएसटीसाठी खर्च होत आहे. यामुळे जिएसटी कमी करावा, नसेल तर चांगल्या चित्रपटांना करमुक्त सवलत द्यावी अशी मागणी निर्माते राजू सावला यांनी केली.

Related posts: