|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चैतन्य परब, डॉ. सरगुरोह, तन्वी रेडीज यांना यंदाचा ‘तरुण भारत’ सन्मान

चैतन्य परब, डॉ. सरगुरोह, तन्वी रेडीज यांना यंदाचा ‘तरुण भारत’ सन्मान 

तरुण भारत वर्धापन दिनी होणार गौरव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे समाजासाठी प्रकाशवाटा बनत नवा आदर्श निर्माण करणाऱया 12 व्यक्ती, 2 संस्थांची यंदाच्या ‘तरुण भारत’ सन्मानसाठी निवड करण्यात आली आह़े  सोमवार, 9 डिसेंबर रोजी ‘तरुण भारत’ रत्नागिरी आवृत्तीच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह़े  या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदाच्या सन्मानसाठी शास्त्रीय गायक चैतन्य परब, आकांक्षा कदम, उल्हास खडपे, प्रज्योत खडपे, शिवा खानविलकर ही त्रयी, डॉ. अल्पाफ सरगुरोह, तन्वी रेडीज, प्रमिलाकाकी शिर्के, सुशील तांबे, विद्याधर कदम, क्रांती म्हसकर, रजनी भोसले यांच्यासह लांजा तालुका कृषी शास्त्रज्ञ मंच व दापोलीतील मानाचा गणपती आपत्ती निवारण मंडळ यांची निवड करण्यात आली आहे.

जिह्यातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणारे ‘तरुण भारत’ हे जिह्यातील प†िहले व एकमेव वृत्तपत्र आह़े वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी काही व्यक्ती व संस्थांना ‘तरुण भारत सन्मान’ ने गौरवले जाते. या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आह़े समाजाला मार्गदर्शन ठरणारे, दिशा देणारे, आधार देणारे काम अनेक व्यक्ती व संस्था करत असतात. अशा व्यक्तींच्या कार्यासमोर नतमस्तक होताना यातून प्रेरणा घेऊन अनेक व्यक्ती व संस्था समाजासाठी पुढे याव्यात, या हेतूने  या पुरस्काराचा प्रारंभ करण्यात आल़ा

यावर्षीच्या पुरस्कारांसाठी अशा बारा व्यक्ती व दोन संस्थांची निवड करण्यात आली आह़े  ऑगस्ट महिन्यात राजापुरात आलेल्या महापुरादरम्यान दोन घटनांमध्ये बुडणाऱया दोघांना वाचवणाऱया 69 वर्षीय उल्हास खडपे यांच्यासह प्रज्योत खडपे व शिवा खानविलकर यांना आपल्या जीवाची बाजी लावत वाचवले होते. देवदुताप्रमाणे धावून आलेल्या या त्रयीचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

अगदी कमी वयात आकाशवाणीच्या शास्त्राrय संगीत स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवणाऱया रत्नागिरीच्या चैतन्य परब व आंतरशालेय व खुल्या स्पर्धामध्ये 50 हून अधिक सुवर्ण पदे मिळवणाऱया व अलीकडेच मालदीव मध्ये झालेल्या प्रेसिडेंट चषक कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱया आकांक्षा कदम यांचीही तरूण भारत सन्मानसाठी निवड करण्यात आली आहे.

वृद्धाश्रमात ठेवण्यात आलेल्या वृद्धांची गेल्या 25 वर्षांपासून कुटुंबातील सदस्याप्रमाणे सेवा करणाऱया व नोकरीपेक्षा सेवेला अधिक महत्व देत वृद्धांची ‘माय’ बनलेल्या देवरूखच्या श्रेयस वृध्दाश्रमातील रजनी भोसले यांचाही ‘तरूण भारत सन्मान’ने गौरव होत आहे.

चिपळुणातील ‘गरीबांचे डॉक्टर’ हा वडीलांचा वारसा सार्थपणे जपणारे, रूग्णांसाठी विविध शिबीरांचे आयोजन करणारे, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अगेसर असणारे डॉ. अल्ताफ सरगुरोह आणि चिपळुण तालुक्यातील चिवेलीचे गेल्या 10 वर्षांपासून नेतृत्व करणाऱया व अनेक उपेक्षीत मुलींना मायेच्या पदराखाली घेत आत्मनिर्भर बनवणाऱया प्रमिलाकाकी शिर्केही यंदाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

अवघ्या चार वर्षात 33 स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करत आशियाई स्पर्धेत भारतासाठी 3 पदकांची कमाई करणारी खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील तन्वी रेडीजचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपंगत्वावर मात करत शिल्प, काष्ठ व चित्रकलेच्या माध्यमातून जीवनातील नवे रंग शोधणारा व तेच उदनिर्वाहाच साधन बनवणाऱया वेरळ येथील मुकबधीर सुशील तांबेने नवा मार्ग दाखवला आहे. त्याचाही सन्मान यावेळी होत आहे.

वयाच्या 22 व्या वर्षापासून रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचवणारे गुहागर तालुक्यातील आबलोली येथील विद्याधर उर्फ विजूअप्पा कदम हे रूग्णासाठी देवदूत ठरत आहे. वयाची 61 गाठलेल्या विजूअप्पांनी आतापर्यंत 83 वेळा रक्तदान केले असून त्यांच्या कार्याचा गौरव ‘तरूण भारत सन्मान’ने केला जाणार आहे.

खेळाच्या साधनसामुग्रीचा अभाव आणि तोकडे आर्थिक बळ असूनही ऍथलीटीक्समध्ये भविष्य घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगत मंडणगडमधील नागरगोली येथील क्रांती मिलींद म्हसकर हिने अनवाणी पायांनी या क्षेत्रात प्रवेश करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. तिच्या या संघर्षाला ‘तरुण भारत सन्मान’ ने गौरवले जात आहे.

कोणतही अपघात, दुर्घटना अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोहचणारा मदतीचा पहिला हात अशी ओळख बनलेल्या व रूग्णवाहीकेची सेवाही तालुक्यात मोफत देणाऱया दापोलीतील ‘मानाचा गणपती’ आपत्ती निवारण पथक व गेल्या 11 वर्षापासून लांजातील शेतकऱयांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत प्रगतशील शेतकऱयांचा तालुका बनवण्यासाठी धडपडणाऱया लांजा तालुका शेतकरी शास्त्रज्ञ मंच या दोन संस्थांच्या कार्याची दखल घेत त्यांचीही ‘तरूण भारत’ सन्मान’ साठी निवड करण्यात आली आहे.

सोमवारी रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालयात सायंकाळी 4.30 वाजता होणाऱया तरूण भारतच्या 24 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या व्यक्ती-संस्थांचा गौरव होणार आहे.

Related posts: