|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नाटय़गफहांमध्ये मोबाईल जॅमर बसवणार

नाटय़गफहांमध्ये मोबाईल जॅमर बसवणार 

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची मागणी

हरकती-सूचना मागविणार

मुंबई / प्रतिनिधी

 नाटय़गफहात एखादे नाटक रंगात आलेले असते आणि गंभीर प्रसंग सुरू असतानाच काही प्रेक्षकांच्या मोबाईलची रिंगटोन सतत वाजू लागते. त्यामुळे कलाकार आणि इतर प्रेक्षकही त्रस्त होतात. सदर बाब लक्षात घेता शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी नाटय़गफहात मोबाईल जॅमर बसविण्याबाबत केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे.

मात्र, जॅमर बसविण्यासाठी अगोदर पेंद्र सरकारची परवानगी घेण्यात येईल आणि 30 दिवसात हरकती सूचना मागविण्यात येतील. तसेच जर काही आणीबाणी परिस्थिती ओढवल्यास आणि प्रेक्षकांना मोबाईल वापराची गरज आवश्यक ठरल्यास उद्भवणाऱया परिस्थितीला आयोजक, नाटय़ निर्माते, नाटय़ संस्था यांना जबाबदार ठरविण्यात येईल, असे स्पष्टीकरणही पालिकेने दिले आहे. त्यामुळे एकीकडे नाटय़गफहात आवडती नाटके चांगल्या प्रकारे बघण्याबाबत प्रेक्षकांचा मूड आणि दुसरीकडे नाटक चालू असताना एकाग्रता भंग करणारे मोबाईल यांच्यात पालिकेला समन्वय साधणे गरजेचे होईल. जर मोबाईल जॅमर बसवला आणि तो प्रेक्षकांसाठी खूपच त्रासदायक, अडचणींचा ठरल्यास आणि त्यांचा उद्रेक झाल्यास जॅमर बसविण्याचा निर्णय प्रशासन व नगरसेविका यांच्या अंगावर उलटण्याची दाट शक्यता आहे.

नाटय़गफहात नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना त्यांचे मोबाईल ‘सायलंट’ ठेवणे अथवा बंद स्थितीत ठेवण्याबाबत अगोदरच सूचित करण्यात येते. मात्र, तरीही नाटक सुरू असताना अनेकदा प्रेक्षकांचे मोबाईल वाजत असतात. त्यामुळे नाटक सादर करणाऱया नाटय़कलाकारांची एकाग्रता भंग होते. तसेच अन्य प्रेक्षकांचाही हिरमोड होतो. याबाबत विक्रम गोखले, सिध्दार्थ जाधव, सुमित राघवन, सुबोध भावे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मोबाईल रिंगटोन वापराला चाप

लावण्याची मागणी करण्यात येत होती. काही लोकांनी मोबाईल जॅमर बसविण्याची उपाययोजना सुचवली होती. त्याच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी नाटय़गफहात मोबाईल रिंगटोन वाजू नये व कलाकारांना नाटक विनाअडथळा सादर करता यावे आणि प्रेक्षकांनाही त्या नाटकाचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी मोबाईल जॅमर बसविण्याची मागणी म्हात्रे यांनी केली होती.

त्यावर पालिकेने सकारात्मकता दर्शवली. मात्र, नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येतील. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीनंतरच याबाबत अंमलबजावणी करता येईल. तसेच जर मोबाईल जॅमरमुळे कोणालाही त्रास झाल्यास अथवा त्याचा काही विपरीत परिणाम झाल्यास त्यास आयोजक, नाटय़ निर्माते, नाटय़ संस्था यांना जबाबदार ठरविण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले.

पॉईंटर्स

निर्णय पेंद्र सरकारची परवानगीनेच घेणार : पालिका

जॅमर लावल्यानंतर आणीबाणी ओढवल्यास जबाबदार आयोजक

कलाकारांचा प्रेक्षकांच्या रिंग वाजणाऱया मोबाईलवर आक्षेप    

Related posts: