|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी उरुसास भाविकांचा लोटला जनसागर

निपाणी उरुसास भाविकांचा लोटला जनसागर 

प्रतिनिधी / निपाणी :

निपाणी दर्गा संस्थापक संत बाबा महाराज यांनी स्थापन केलेल्या महान अवलिया पिरानेपीर दस्तगीर साहेब उरुसाचा मुख्य दिवस रविवारी झाला. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणारा व कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया तुरबतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

शनिवारी सायंकाळी गंध चव्हाण वाडय़ातून दर्गाहमध्ये आणण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत दंडवत घालण्यासाठी भाविकांनी दर्गाह परिसरात मोठी गर्दी केली होती. दर्गाह परिसरात खेळण्याची, मेवा मिठाईची दुकाने थाटली होती. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. रविवारी पहाटे चव्हाण वाडय़ातून गलेफ चढविण्यात आला.

रविवारीच कंदुरी असल्याने पै-पाहुणे, मित्र मंडळींनी मोठी गर्दी केली होती. दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उरुस मार्गावर मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक व उपनिरीक्षक कुमार हडकर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

मंगळवारी उरुसाचा शेवटचा दिवस

सोमवारी सकाळी 7 ते 6 पर्यंत खारीक, उदीचा कार्यक्रम चव्हाण वाडा, जिजामाता चौक येथे होणार आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता म्युनिसिपल हायस्कूलवर भव्य कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. 10 रोजी मानाच्या फकिरांची रवानगी व भंडारखाना होणार आहे. 12 रोजी चव्हाण वारसदार व मानकरी लवाजम्यासह दर्गा देवस्थान व संत बाबा महाराज चव्हाण समाधीस अभिषेक गोडा नैवेद्य दाखवून मानकऱयांची रवानगी होणार आहे. याच दिवशी उरुस समाप्त होणार आहे.

Related posts: