|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फलोत्पादनचा कांदा 90 रुपये किलो

फलोत्पादनचा कांदा 90 रुपये किलो 

अन्य भाज्याही कमी दराने उपलब्ध

प्रतिनिधी/ पणजी

 फलोत्पादन महामंडळामध्ये कांदा 90 ते 100 रुपये प्रती किलो विकला जात आहे. महामंडळातील दर हा खुल्या बाजारातील दरापेक्षा 60 ते 70 रुपये प्रती किलोने कमी आहे. खुल्या बाजारात कांद्याचे दर हे फलोत्पादन महामंडळापेक्षा महाग असल्याने लोकांनी महामंडळातील कांदा खरेदी करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

 फलोत्पादन महामंडळात कांद्यासह अन्य भाज्याही कमी दरात उपलब्ध आहेत. कांदा 90 रुपये किलो, टॉमेटो 24 रुपये, बटाटे 30 रुपये, गाजर  66 रुपये, काकडी 26 रुपये, कारले 42 रुपये, कोबी 27, फ्लॉवर 32, दुधी 13 रुपये, वांगी 24, बीट 45, टेंडली 35, भोपळा 22, दोडगी 35, वाल 30, मिरची  34, आले 70, तर भेंडी 42 रुपये किलोने विकली जात आहे.

 खुल्या बाजारातील भाजीच्या किंमती

 कांदा 150 ते 200 रुपये किलो, बटाटे 30 रुपये, टॉमेटो 30 रुपये, गाजर 40 रुपये, भेंडी 45 रुपये, काकाडी 40 रुपये, गवार 60 रुपये, दोडगी 40 रुपये, वांगी 40, सिमला मिरची 40, कारले 40,  बीट 50, हिरवी मिरची 60 ते 80, दुधी 20 रुपये, कोबी 30 रुपये किलो.

 

Related posts: