|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » कॅरिअर डायरी

कॅरिअर डायरी 

भारतीय क्रीडा प्राधिकरण

भारतीय क्रीडा प्राधिकरणात 130 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता इच्छुक पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज दाखल करायचा आहे.

एकूण: 130 जागा

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल (तरूण व्यावसायिक)

शैक्षणिक पात्रता: 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 3 वर्षे अनुभवासह पदवीधर असणे आवश्यक पात्रता असणार आहे.

वयाची अट: 20 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 32 वर्षे पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2019 या तारखेच्या आत इच्छुकांचे अर्ज दाखल व्हायला हवेत.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019 होणार आहे. याकरीता 10 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज दाखल करता येईल.

परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक स्तर
(सीएचएसएल) परीक्षा 2019

एकूण: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव

  1. कनिष्ठ
    विभाग लिपिक (एलडीसी)/
    कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएसए)
  2. पोस्टल असिस्टंट (पीए)/सॉर्टिंग असिस्टंट (एसए)
  3. डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ)
  4. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘ए’

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण.

वयाची अट: 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 27 वर्षे (इतरांना सवलत)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क- सामान्य, ओबीसी : रु.100 (इतरांना शुल्क नाही)

परीक्षा (सीबीटी):

टायर वन: 16 ते 27 मार्च 2020

टायर टू: 28 जून 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग

खादी आणि ग्रामोद्योग आयोगांतर्गत तरूण व्यावसायिकांच्या (यंग प्रोफेशनल्स) च्या जागा भरायच्या आहेत. या पदांसाठी अर्ज करायचा झाल्यास 10 जानेवारी 2020 ही शेवटची तारीख असणार आहे.

एकूण पदे- 75

पद- तरूण व्यावसायिक (यंग प्रोफेशनल्स)

शैक्षणिक पात्रता- पदवी वा पदव्युत्तर पदवीधर असणाऱया उमेदवारांनी अर्ज करायला हरकत नाही.

वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 10 जानेवारी 2020 रोजी 27 पेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा कराल- इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन दाखल करायचा आहे.

शेवटची तारीख- 10 जानेवारी 2020 या तारखेपूर्वी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ लिमिटेड

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ लिमिटेड, यवतमाळ यांना अप्रेंटीसच्या जागा भरायच्या आहेत. याकरीता पात्र उमेदवारांचे अर्ज 16 डिसेंबर 2019 पर्यंत दाखल व्हावे लागणार आहेत.

एकूण पदे- 47

पदे- 1) अप्रेंटीस- 2) इलेक्ट्रीशियन-13 पदे  3) वायरमन-34

पात्रता- आयटीआय उत्तीर्ण असण्याची अट असणार आहे.

अर्ज कसा कराल- इच्छुक पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन दाखल करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. मर्या. संवसु विभागीय कार्यालय भांडार केंद्र, लोहार रोड, यवतमाळ

शेवटची तारीख- 16 डिसेंबर 2019 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.mahadiscom.in

 

Related posts: