|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दीडशे माकडांचा म्हावंळणकरवाडीत हैदोस

दीडशे माकडांचा म्हावंळणकरवाडीत हैदोस 

घरात घुसतात माकडे : मंगळवारी दुपारी तीन घरातील साहित्याचे नुकसान

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग शहरातील म्हावळंणकरवाडी येथे सुमारे 150 माकडांचा हैदोस सुरु आहे. यामध्ये मंगळवारी दुपारी तीन घरांत माकडांनी एंट्री करीत कडधान्यासह बनविलेल्या जेवणाचे नुकसान केले. या प्रकारामुळे सध्या म्हावंळणकरवाडीत भीतीचे वातावरण पसरले आहेत.

याबाबतचे माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून म्हावळंणकरवाडीत माकडांचा हैदोस सुरू आहे. तो रोखण्यासाठी वाडीतील महिला मंगळवारी सकाळी वनविभागाकडे आले होते. निवेदन देऊन ग्रामस्थ, महिला घरी पोहचताच तो जवळपास तीन घरातील साहित्याचे माकडांनी (लाल तोंड असलेली) मोठे नुकसान केले. याबाबत माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांना गावातील ग्रामस्थांनी माहिती दिली. त्याननंतर श्री. नानचे यांनी वनविभागाच्या अधिका-यांना म्हावंळणकरवाडीत बोलावून घेतले व त्यावेळी संतोष नाईक, अरविंद नाईक, दिपक म्हावळणकर आदी ग्रामस्थांचे केलेले नुकसान दाखविले. नाईक यांच्या खिडकीतुन माकडे घुसली व पीठ, कडधान्य यांचे डबे उघडत नुकसान केले. शिवाय बनविलेल्या जेवणाचेही नुकसान केले.

फटाक्यांनी घाबरत नाहीत माकड

  वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अनेक माकडे घराच्या शेजारी ठाण मांडुन बसले होते. यावेळी ग्रामस्थांनी फटाके लावून त्यांना घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र, माकडे जुमानत नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे वनविभागाचे कर्मचारीही हतबल झाले.

राखणीसाठी कर्मचारी ठेवा

माकडांचा हैदोस रोखण्यासाठी वनविभाग असमर्थ ठरत असून ग्रामस्थांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जो पर्यंत वनविभाग माकडांना रोखत नाही. तो पर्यंत वाडीत वनविभागाचे कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी श्री. नानचे यांनी केली.

Related posts: