|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » कर्नाटक पहिल्या डावात सुस्थीत

कर्नाटक पहिल्या डावात सुस्थीत 

वृत्तसंस्था/ दिंडीगुल

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या ब गटातील सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान कर्नाटकाने पहिल्या डावात 336 धावा जमविल्या पडिकल, पवन देशपांडे आणि के. गौतम यांनी अर्धशतके झळकविली. दिवसअखेर तामिळनाडूने पहिल्या डावात 4 165 धावा जमविल्या.

या सामन्यात कर्नाटकाने 6 बाद 259 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांच्या शेवटच्या चार फलंदाजांनी  77 धावांची भर घातली. कर्नाटकाचा पहिला डाव 336 धावांत आटोपला. पडिकलने 78, पवन देशपांडेने 65 आणि के. गौतमने 51 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे आर. अश्विनने 4 तर सिद्धार्थ आणि विग्नेश यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तामिळनाडूच्या पहिल्या डावात अभिनव मुकूंदने 47, बाबा अपराजीतने 37, मुरली विजयने 32 धावा केल्या. दिनेश कार्तिक 23 धावांवर खेळत आहे. कर्नाटकाच्या गौतमने 61 धावांत 3 गडी बाद केले.

कर्नाटक प.डाव- 336 (देवदत्त पडीकल 78, पवन देशपांडे 65, आर अश्विन 4-79), तामिळनाडू प. डाव 4 बाद 165 (अभिनव मुंकूद 47, बाबा अपराजीत 37, गौतम 3-61).

Related posts: