|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर 

ऑनलाईन टीम नवी दिल्ली

दिवसभर झालेल्या चर्चेनंतर अखेर राज्यसभेत देखील नागरिकता सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक सादर केल, यानंतर प्रचंड शाब्दिक चकमक उडाली, दिवसभर झालेल्या चर्चेनंतर संध्याकाळी विधेयकावर मतदान घेण्यात आले. यावेळी विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली, तर विरोधी बाजूने १०५ मते पडली.  विधेयकावर मतदान पार पडल्यानंतर राज्यसभा स्थगित करण्यात आली. 

त्यानंतर विरोधकांनी या विधेयकामध्ये १४ सूचना मांडल्या. यानंतर देखील यावर मतदान घेण्यात आले. या मतदानानंतर  १४ पैकी बहुतांश सूचना फेटाळण्यात आल्या. शिवसेनेने मतदानात सहभाग न घेता सभात्याग केला.
लोकसभेत शिवसेनेकडून या विधेयकाला पाठिंबा देण्यात आला होता.

विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी हा देशाच्या संवैधानिक वाटचालीमधील  काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली.

Related posts: