|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » उद्योग » सॅमसंगकडून गुवाहाटीत ‘डिजिटल ऍपॅडमी’

सॅमसंगकडून गुवाहाटीत ‘डिजिटल ऍपॅडमी’ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्मार्टफोन तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनवणारी कंपनी सॅमसंग इंडियाने भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटीमध्ये   सॅमसंग डिजिटल ऍपॅडमीचे बुधवारी उद्घाटन केले. 
सॅमसंग इनोव्हेशन लॅबमध्ये आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), एम्बेडेड सिस्टिम, कृत्रिम आणि मशीन शिक्षणाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे त्यांना उद्योगाशी संबंधीत कौशल्ये आत्मसात करण्यासह रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. या ऍपॅडमीद्वारे पुढील तीन वर्षात 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

सॅमसंग डिजिटल ऍपॅडमी कार्यक्रमामुळे आसाम राज्याला पुढील पिढीकडून तंत्रज्ञान परिस्थिती प्रणालीच्या विकासात भूमिका निभावण्यासाठी मदत मिळेल. तसेच ते राज्यात रोजगार निर्मितीची महत्वाची भूमिका निभावतील, असे आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोणोवाल यांनी सांगितले.

Related posts: