|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मध्यप्रदेशच्या दोन खेडय़ांमध्ये कर्करोग उद्रेकामुळे भय

मध्यप्रदेशच्या दोन खेडय़ांमध्ये कर्करोग उद्रेकामुळे भय 

वृत्तसंस्था~ भोपाळ

मध्यप्रदेशातील दोन खेडय़ांना सध्या कर्करोगाच्या भीतीचा विळखा पडला आहे. गेल्या पाच वर्षात या खेडय़ांमध्ये 50 जणांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. असा प्रकार त्यापूर्वी इतक्मया मोठय़ा प्रमाणात कधीही घडला नव्हता. त्यामुळे या गावांमधील नागरिक भयभीत झाले असून कित्येकांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गावे एकमेकांच्या शेजारी असून त्यांची नावे भोजाखेरी (लोकसंख्या 1900) आणि केरवासा (लोकसंख्या 1000) अशी आहेत.

भोजाखेरीमध्ये पाच वर्षात 35 मृत्यू कर्करोगाने झाले आहेत तर केरवासामध्ये ही संख्या 13 आहे. मध्यप्रदेश सरकारने कर्करोगाच्या या उदेकाचा तपास करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठविले आहे. गावातील लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे किंवा चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे कर्करोगाचा प्रादुर्भाव झाला आहे काय, याची तपासणी हे पथक करणार असून उपायही सुचविणार आहे.

या दोन खेडय़ांमध्ये कर्करोगाचा हा उदेक पूर्वी नव्हता. पाच वर्षांपूर्वी वर्षात एखाद्याचा मृत्यू कर्करोगाने होत असे. पण हे प्रमाण अचानक वाढल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले असून याच्या कारणांचा शोध त्यांना घेता येईनासा झाला आहे. वातावरणात किंवा ग्रामस्थांच्या सवयींमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नसूनही असे का घडत आहे, हा प्रश्न त्यांना पडला असून त्याची उत्तरे तज्ञ शोधून काढतील, अशी अपेक्षा आहे.

Related posts: