|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा : सातार्‍याच्या न्यू इंग्लिश स्कूलची बाजी

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा : सातार्‍याच्या न्यू इंग्लिश स्कूलची बाजी 

सातारा/प्रतिनिधी

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन व मराठी विज्ञान परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यू इंग्लिश स्कुल, सातारा विद्यालयाच्या इंडिया डीड इट!’ ह्या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. दि. १२ व १३ डिसेंबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडली.

नाट्य आणि विज्ञान ह्यांचा मेळ साधून कलाकृतींना व्यासपीठ देणारी ही अभिनव स्पर्धा ऑक्टोबरमध्ये सहा विभागांत पार पडली होती. सुदर्शन रंगमंच, पुणे येथे पार पडलेल्या पुणे विभागीय स्पर्धेत सातार्‍याच्या न्यू इंग्लिश स्कुलने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावरील आपला प्रवेश निश्चित केला होता.

तीस वर्षांपूर्वी आपल्याकडे महासंगणक नव्हता. त्यावेळी असा संगणक मिळवण्याचे झालेले प्रयत्न, त्याला आलेले अपयश आणि त्यातून डॉ. विजय भटकर आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन बनवलेल्या परम महासंगणकाच्या निर्मितीमागचे नाट्य लेखक जगदीश पवार ह्यांनी अत्यंत प्रवाही पद्धतीने उलगडून दाखविले आहे. ह्या एकांकिकेचे दिग्दर्शन जगदीश पवार यांनी केले आहे. नेपथ्य व पार्श्वसंगीत मस्कु मोरे यांचे तर रंगभूषा व वेशभूषा रसिका केसकर यांची आहे. प्रकाशयोजना जगदीश पवार ह्यांनीच केली आहे. न्यू इंग्लिश स्कुलच्या ह्या यशाबद्दल त्यांचे शाळा समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, सदस्य अनंत जोशी, शालाप्रमुख सुनील शिवले ह्यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts: