|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » माधुरी पोतदार यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन

माधुरी पोतदार यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावच्या कवी माधुरी पोतदार यांच्या ‘फुलबाग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी अनगोळ येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरूजी सभागृहात झाले. जेष्ठ पत्रकार अशोक याळगी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कराड येथील दिलीप कुलकर्णी व बुक लव्हर्स क्लबचे अध्यक्ष व प्रकाशक सुधीर जोगळेकर उपस्थित होते.

यावेळी अशोक याळगी म्हणाले, माधुरी यांनी मराठी बरोबरच हिंदी कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात केला आहे. त्याचबरोबरच वेगवेगळे काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. एका माधुरी पोतदार यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन भावनाविस्तार या कवितांतून झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी किशोर काकडे म्हणाले, कवी हा संवेदनशील असावाच लागतो. माधुरी पोतदार यांच्या कवितांमधून समाज व कौटुबिंक जिव्हाळा दिसून येतो असे त्यांनी सांगितले. सुधीर जोगळेकर म्हणाले, जितकी प्रसिद्धी नावाजलेल्या कवींना मिळते, तशी प्रसिद्धी, प्रोlसाहन नव्या कवींना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शिप्रा कुलकर्णी यांनी शारदास्तवन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणूका माडीवाले यांनी केले. संजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. माधुरी पोतदार यांच्या गुरू प्रा. विजया धोपेश्वरकर यांचाही सत्कार करण्यात आला.

Related posts: