|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » आलिशान घरांना वाढती मागणी

आलिशान घरांना वाढती मागणी 

धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून परवडणाऱया घरांच्या योजनांना वेग आला आहे. सध्याला एकंदरच घरांच्या विक्रीत म्हणावी तशी वाढ दिसत नाही. असे असले तरी लक्झरी हाऊसिंग सेक्टरमध्ये मात्र तेजीचे वातावरण असून अशा घरांना मागणी वाढल्याचे चित्र आहे. आलिशान घरे मागणीत वरचढ ठरली आहेत.

रिअल इस्टेटमध्ये गेल्या तीन-चार वर्षापासून सुस्ती दिसते. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी, बँकांच्या एनपीएत वाढ, एनबीएफसीची बिघडलेली स्थिती आदींचा परिणाम रिअल इस्टेटवर झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिसेल बाजाराबरोबरच आलिशान घरांच्या सेगमेंटला देखील मोठा धक्का बसला होता. परिणामी लक्झरी हाऊसिंगच्या विक्रीत कमालीची घसरण झाली होती. वास्तविक लक्झरी होमच्या क्षेत्रात दोन वर्षे शुकशुकाट होता. म्हणूनच विकासकांनी आलिशान फ्लॅटच्या निर्मितीत आखडता हात घेतला होता. ग्राहकांकडून कमी किंमतीतील कोझी आणि परवडणाऱया घरांना पसंती दिली जात होती. मात्र पुन्हा एकदा ग्राहकांनी लक्झरी होम सेगमेंटमध्ये रुची दाखवण्यास सुरवात केली आहे. एनरॉकच्या नवीन आकडेवारीनुसार स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील हाऊसिंग सेंगमेटमध्ये सध्यातरी फारसे समाधानकारक चित्र नाही, मात्र लक्झरी घरांनी विक्रीत वेग पकडला आहे आणि तोही विक्रमी रितीने.

एनरॉक प्रॉपर्टीज कन्सल्टंटचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या मते, देशभरातील प्रमुख सात शहरातील एकूण दीड कोटी रुपये किंमतीच्या आलिशान श्रेणीतील 16,100 घरांची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 2017 मध्ये केवळ 5240 घरे लाँच झाली. त्यातुलनेत आजची आकडेवारी समाधानकारक आहे. दुसऱया शब्दात सांगायचे झाल्यास नोटाबंदीनंतर आलिशान घरांच्या वितरणात प्रभावीपणे वाढ झाल्याचे चित्र आहे. 2018 च्या पहिल्या सहा महिन्यानंतर मागील वर्षाच्या समकालीन काळाच्या तुलनेत 40 टक्के वाढ झाली आहे. 2019 च्या पहिल्या सहा महिन्यात आलिशान घरे ताब्यात देण्याच्या प्रकरणात मुंबई एमएमआर आणि दिल्ली एनसीआर आघाडीवर राहिले. हे प्रमाण देशातील सात शहरातील घरांच्या ताबा देण्याच्या तुलनेत 59 टक्के राहिले आहे. बंगळूर आणि हैदराबाद येथे अनुक्रमे 2,210 तसेच 2,070 घरे विकली गेली. विशेष म्हणजे दीड ते अडीच कोटी दरम्यान किंमतीची 9,940 नवीन आलिशान घरे लाँच करण्यात आली. परंतु या सेगमेंटमध्ये वाढता प्रतिसाद लक्षात घेता उर्वरित 6610 घरांची अडीच कोटींपेक्षा अधिक किंमत ठेवण्यात आली. शेवटी परवडणाऱया घरांना मागणी वाढलेली असताना दुसरीकडे आलिशान घराच्या सेगमेंटमध्ये देखील ग्राहकांची रुची वाढली आहे.

तज्ञांच्या मते, काही महिन्यांपासून आलिशान घरांना मागणी वाढली आहे. लोकांचे राहणीमान उंचावत असून उत्पन्नदेखील वाढले आहे. त्यामुळे गुंतवणुकीबरोबरच आरामदायी जीवनशैलीचा विचार केला जात असल्याने या सेगमेंटध्ये विक्री वाढली आहे.

 भारताची लोकसंख्या सतत वाढत चालली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणीमान भारतात विकसित होत असून त्याचे प्रतिबिंबही आपल्याला दिल्ली, मुंबई, बंगळूर, पुण्यात पाहावयास मिळते. अत्याधुनिक सोयीसुविधांनी घर सुसज्ज असावे, अशी मानसिकता नागरिकांची झाली आहे. म्हणूनच महागडय़ा घरांचा विचार केला जात आहे. अशी घरे घेणाऱयांना स्विमिंगपूल, जिम, बगिचा सारख्या सुविधाही मिळू लागल्या आहेत. जीवनशैली आधुनिक झाली असल्याकारणाने सर्व गोष्टी आधुनिक घेण्यावर श्रीमंताचा भर दिसतो आहे. भारतीय एनआरआयदेखील रिअल इस्टेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये मागणी असून ती वाढतच चालली आहे. अशा प्रकारे मागणी वाढल्याने बांधकाम क्षेत्राच्या विकासाला हातभार लागतो आहे.

 अशा स्थितीत देशातील सामान्य नागरिक परवडणाऱया घरांचा विचार करतात. परंतु सामान्य किंवा उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील ग्राहकांचा टेंड बदलत चालला आहे. ही मंडळी कोणत्या ना कोणत्या कारणाने देश-विदेशात खूप प्रवास करतात आणि आलिशान घराच्या खरेदीबाबत सकारात्मक राहत असल्याचे दिसून येत आहे.  ही सकारात्मकता आलिशान घरांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

2017 ते 2018 च्या कालावधीत श्रीमंतांची संख्याही वाढलेली दिसून आली आहे. ही संख्या 4 टक्के इतकी वाढल्याचे समोर आले आहे. पुढील 5 वर्षात श्रीमंतांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षीत धरली जात आहे. त्यामुळे लक्झरी घरांच्या प्रकल्पांना अच्छे दिन येतील, हे नक्की.

 मोठय़ा शहरात काही ठराविक उपनगरे वा ठिकाणे ही आलिशान घरांच्या उभारणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्याठिकाणी असे प्रकल्प सुरू असतात. लक्झरी घरांचे प्रकल्प असणाऱया विविध शहरातील काही लोकप्रिय ठिकाणांची यादी पाहुया.

शहरे आणि भाग

मुंबई

तारदेव

वरळी

नेपीयन्सी रोड

बांद्रा (पश्चिम)

खार(पश्चिम)

प्रभादेवी

मलबार हिल्स

नवी दिल्ली-

गेटर कैलाश वन व टू

पृथ्वीराज रोड

चाणक्यपुरी

गोल्फ लिंक्स रोड

बेंगळूर-

लँगफोर्ड गार्डन्स

सदाशिवनगर

इंदिरानगर

विजय मल्या रोड

वसंत नगर

कस्तुर्बा रोड

रिचमंड रोड

चेन्नई-

नुंगम्बंकम

आरए पुरम

बोटक्लब

पोस गार्डन

सुनीता जोशी

Related posts: